agriculture news in marathi, There are no movements to start a Mhasal scheme | Agrowon

म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी हालचाली नाहीत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सांगली ः जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. मात्र, म्हैसाळ उपसा सिंचन योजना अद्यापही सुरू झालेली नाही. ही योजना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणीच केली नाही, असा दावा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ही योजना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली नाहीत. परंतु, गेल्या महिन्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली, त्या बैठकीत ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय झाला होता. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. मग म्हैसाळ योजना का सुरू झाली नाही, असा प्रश्‍न शेतकरी करू लागला आहे.

सांगली ः जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. मात्र, म्हैसाळ उपसा सिंचन योजना अद्यापही सुरू झालेली नाही. ही योजना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणीच केली नाही, असा दावा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ही योजना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली नाहीत. परंतु, गेल्या महिन्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली, त्या बैठकीत ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय झाला होता. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. मग म्हैसाळ योजना का सुरू झाली नाही, असा प्रश्‍न शेतकरी करू लागला आहे.

जिल्ह्यात यंदा पाऊस कमी असल्यामुळे यंदा सिंचन योजना तातडीने सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद खासदार संजय पाटील यांनी बैठक घेतली. यामध्ये थकीत वीजबिलाचा प्रश्‍न मार्गी लागतो असे आश्‍वासन दिले. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत थकीत वीजबिलाचा प्रश्‍न सोडवला. त्यानंतर ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. म्हैसाळ उपसा सिंचन योजना चार दिवसांत सुरू होणार, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही ही योजना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत.  

पाणीपट्टीच्या नव्या समीकरणानुसार शेतकऱ्यांनी पाणीपट्टीदेखील भरली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची सुमारे ३ कोटी रुपये पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरली आहे.  शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम ही थकीत आहे, की सोडलेल्या आवर्तनाची असा घोळ निर्माण झाली असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सध्या पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे.

म्हैसाळ सुरू होण्यासाठी मागणीच नाही
सध्या पाणीटंचाई आहे. त्यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू व्हावी, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. जरी ही योजना सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असला तरी, शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते आहे. त्यामुळे ही योजना सुरू होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.

इतर बातम्या
तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल...बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व...
पावसाने द्राक्ष शेतीचे ९ हजार कोटींवर...पुणे : सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष...
काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी...फळे आणि भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी...
भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर...रत्नागिरी ः क्यार वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या...
वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे...अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान कौशल्य...
नागपूर : रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी...नागपूर ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या...
नाशिक : रब्बी हंगामाच्या क्षेत्रात ३०...येसगाव, जि. नाशिक ः दमदार पावसामुळे गाव व परिसरात...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना...कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून...
बियाणे कंपन्यांचे हित जपण्यासाठीच...यवतमाळ ः केंद्र सरकार बियाणे अधिनियमात सुधारणा...
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची...पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या...
शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची...परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
राज्यात बहुतांंश भागांत तापमान २०...पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी...
सातारा : पंचनाम्याचा फेरा नको; सरसकट...सातारा  ः जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान...
पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार...पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक...
तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तारण...नांदेड  ः  २०१८-१९ या वर्षात शेतीमाल...
भाजप सत्ता स्थापन करणार नाही :...मुंबई  : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण...
श्रीगोंदे तालुक्यात पिके गेली; पण...श्रीगोंदे, जि. नगर  : श्रीगोंदा तालुक्यात...
`ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही`कोल्हापूर  ः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान...
जन्मभूमी रामलल्लाचीच; 'अयोध्या' प्रकरणी...नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍...औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर...