Agriculture news in Marathi There are no veterinary officers in the seven hospitals in Sindhudurg | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्गातील सात दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारीच नाहीत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

जिल्ह्यात तालुकानिहाय असलेल्या आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी सात दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या लम्पी स्कीन आजाराचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी सभेत करण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात तालुकानिहाय असलेल्या आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी सात दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या लम्पी स्कीन आजाराचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी सभेत करण्यात आली.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, रोहिणी गावडे, स्वरूपा विखाळे, मानसी धुरी, दिलीप तळेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील जनावरांना सध्या लम्पी स्कीनचा संसर्ग दिसून येत आहे. काही भागांत संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु या रोगावर उपचार करणारी पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा कोलमडलेली आहे.

तालुकानिहाय प्रमुख आठ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यातील सात दवाखान्यांमध्ये अधिकारीच नाही. त्यामुळे जनावरांवर उपचार कुणी करायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

या वेळी पदे रिक्त असल्यामुळे आपल्याला स्वतः शेतकऱ्यांपर्यंत जाऊन सेवा द्यावी लागत असल्याचे मत डॉ. शिंपी यांनी व्यक्त केले. दुधाळ जनावरांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत आहे. दरवर्षी १२४ प्रस्तावांना मंजुरी दिली जात होती. परंतु कोरोनामुळे निधी गोठविण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षी फक्त ६२ प्रस्तावांनाच मंजुरी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...