Agriculture news in marathi, There are still water shortages in the five districts of Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत अजूनही पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड हे तीन जिल्हे वगळता औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील ७१७ गावे, वाड्यांना आजही पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. या पाच जिल्ह्यांतील १५ लाख ३५ हजारांवर लोकांसमोर पाणीटंचाईचे संकट आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४८१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड हे तीन जिल्हे वगळता औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील ७१७ गावे, वाड्यांना आजही पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. या पाच जिल्ह्यांतील १५ लाख ३५ हजारांवर लोकांसमोर पाणीटंचाईचे संकट आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४८१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ५५ गावांमधील ९१ हजार २५९ लोकांना ३८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील ७६ गावे, १३ वाड्यांमधील १ लाख ८१ हजार १५३ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. ९५ टॅंकरच्या साह्याने त्या ठिकाणी पाणी पुरविले जात आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत जास्त पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यातील २९६ गावे, १२१ वाड्यांमधील ७ लाख ८३ हजार २९२ लोकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. या ठिकाणी ४८१ टॅंकर सुरू आहेत. 

लातूर जिल्ह्यातील ३८ गावे, १ वाडीतील ९७ हजार ६४० लोकांना पाणीसंकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी ४१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १०८ गावे, ९ वाड्यांमधील ३ लाख ८१ हजार ८९९ लोक टंचाईचा सामना करीत आहेत. २७ सप्टेंबर अखेरपर्यंत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गाव, वाड्यांची संख्या ८२५ होती. त्या तुलनेत ३० सप्टेबरअखेरपर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या जवळपास १०८ ने घटल्याचे दिसते. पावसाळा संपत आला आहे. पावसाने एक दोन तालुके वगळता संपूर्ण मराठवाड्यावर दाखविलेल्या अवकृपेमुळे पाणीटंचाईचे संकट थांबत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

१६३८ विहिरींचे अधिग्रहण

पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील १६३८ विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ११, जालना ६७, बीड ५७५, लातूर ३५०, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ६३५ विहिरींचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...