नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत, बाजारभावात सुधारणा

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत, बाजारभावात सुधारणा
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत, बाजारभावात सुधारणा

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक १३९४ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली. तसेच बाजारपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावातही सुधारणा झाली. लवंगी मिरचीला ५७०० ते ६५००, तर ज्वाला मिरचीला ५००० ते ६००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची जास्त झाल्याने बाजारभाव कमी-अधिक राहिले. टोमॅटोला १०० ते ४००,  वांगी ८० ते २५०,  फ्लॉवर ८० ते १८० असे प्रती १४ किलोस दर मिळाले. कोबी ७० ते १६० असा प्रतिकिलोस दर मिळाला. ढोबळी मिरचीला १७० ते २३० प्रती ९ किलोस दर मिळाला. भोपळा ६० ते १७५, कारले ४८० ते ६५०, गिलके १९० ते ४५०, भेंडी १८० ते ३०० असे प्रती १२ किलोस दर मिळाले. काकडीला १५० ते २५०, लिंबू ४०० ते ८८०, दोडका ५०० ते ७०० असे प्रती २० किलोस दर मिळाले.

वळपापडी घेवड्याची आवक २५३० क्विंटल झाली. त्यांची मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३००० ते ४००० दर मिळाला, तर घेवड्याला ६००० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक ६५४४  क्विंटल झाली. त्यास १००० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १००० ते ४७००, मेथी ७०० ते २७००, शेपू ५०० ते २२००, कांदापात १२०० ते ४७००, पालक १५० ते ३६०, पुदिना ९० ते २७० असे दर प्रतिशेकडा जुड्यांना मिळाले. उन्हाळ कांद्याची आवक १३८९३ क्विंटल आवक झाली. बाजारभाव २००  ते ९२५ प्रतिक्विंटल होते. त्याची मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक ८२०७  क्विंटल झाली. बाजारभाव ७५०  ते १३०० प्रतिक्विंटल होते.

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ६४५९ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून बाजापेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ५०० ते ३०५० व मृदुला वाणास ५७५ ते ६१५० प्रतिक्विंटल दर मिळाला. खरबूजाची आवक ५६८ क्विंटल झाली. बाजारभाव १७०० ते २६०० प्रतीक्विंटल मिळाला. टरबुजाची आवक २६९० क्विंटल झाली. बाजारभाव ५५० ते १३५० प्रती क्विंटल मिळाला. आंब्याची आवक २०६२ क्विंटल झाली. केशर आंब्यास ८५०० ते ११००० , बदाम आंब्यास ५००० ते ७५००, तर लालबाग ५००० ते ७५०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com