पितृपक्षामुळे नाशिकला पालेभाज्यांना मागणी वाढली

पितृपक्षामुळे नाशिकला पालेभाज्यांना मागणी वाढली
पितृपक्षामुळे नाशिकला पालेभाज्यांना मागणी वाढली

नाशिक : पितृपंधरवडा, सर्वपित्री अमावास्या, घटस्थापना या सणांचा माहोल गत सप्ताहातील भाजीपाला बाजारात राहिला. या काळात भाजीपाल्यांना विशेषत: पालेभाज्यांना विशेष मागणी राहिली. स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढल्यामुळे पालेभाज्यांसह वांगी, घेवडा, आले, डाळिंब या शेतीमालाला तेजीचे दर मिळाले. बाजारात लाल कांद्याचे आगमन झाले असल्याने या नव्या कांद्याला चांगली दरवाढ मिळाली. दरम्यान टोमॅटोच्या दरातही काही प्रमाणात सुधारणा झाल्याने टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला.

नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात वांग्याची सरासरी २०० क्विंटल आवक झाली असता वांग्याला प्रतिक्विंटलला २००० ते ४००० व सरासरी ३२०० रुपये दर मिळाले. या काळात बहुतांश फळेभाज्या व पालेभाज्यांना चांगले दर मिळाले. पितृपंधरवडा असल्याने भाज्यांना चांगली मागणी होती. स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारातूनही ही मागणी वाढती राहिली. पालेभाज्यांना या काळात तेजीचे दर मिळाले.

कोथिंबिरीची आवक ८० हजार जुड्यांची होती. कोथिंबिरीच्या प्रति १०० जुड्यांना ३००० ते ५००० व सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. या काळात आल्याची आवक घटली. गत सप्ताहात आल्याची अवघी ३ ते ७ क्विंटल या दरम्यान आवक झाली. आल्याला ७४०० ते ९००० व सरासरी ८४०० रुपये दर मिळाले. नाशिक भागातील गाजराचा हंगाम सुरू झाला आहे. गाजराची आवक सरासरी ३५० क्विंटल झाली असता गाजराला १३०० ते २००० व सरासरी १६५० असे दर मिळाले. मागील पंधरवड्यापासून लिंबाला चांगला उठाव वाढला आहे. गत सप्ताहात सरासरी २० क्विंटल आवक होती. लिंबाला प्रतिक्विंटलला २००० ते ४५०० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला.

टोमॅटो प्रतिक्रेट ४० ते २६१ नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गत सप्ताहात टोमॅटोची २ लाख क्रेटची आवक झाली. प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ४० ते २६१ रुपये व सरासरी १४५ रुपये दर मिळाले. गत सप्ताहाच्या सुरवातीला टोमॅटोच्या सरासरी दरात १७५ रुपयांपर्यंत वाढ झाली होती. मात्र, नंतर त्यात १३० पर्यंत उतरण झाली. येत्या सप्ताहात टोमॅटोचे दर स्थिर राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com