साताऱ्यातील शेतकऱ्यांच्या ऊस दराबाबत आशा पल्लवित

There is hope for farmers' sugarcane prices in Satara
There is hope for farmers' sugarcane prices in Satara

सातारा ः जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ऊस दर आणि पहिला हप्ताही जाहीर केला आहे. यात अथणी-रयत या कारखान्याने एफआरपी देत सध्यातरी सर्वाधिक दर दिला आहे. दराचा हा फार्म्युला इतर कारखाने स्वीकारणार का एफआरपीचे तुकडे करून दर दिला जाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत दराबाबत चित्र स्पष्ट होणार असलेतरी अथणी-रयतच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

जिल्ह्यात गळीत हंगामास वेग आला आहे. सध्या जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. यामध्ये अजिंक्यतारा, न्यू फलटण व नुकताच अथणी रयत कारखान्याने पहिला हप्ता जमा केला आहे. यामध्ये अजिंक्यतारा ९० ते १० असे सूत्र स्वीकारत पहिला हप्ता २५०० रुपये दिला आहे. न्यू फलटण या खासगी कारखान्यांनी २५०० रुपये हप्ता जमा केला आहे. अथणी-रयत कारखान्याने मात्र एफआरपी अधिक दर पहिला हप्ता २८०० रुपयांनी दिला आहे. यातून एफआरपीपेक्षा जास्त देता येऊ शकतो, हे यातून दिसून आले आहे. 

यामुळे उसाला जादा दर मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गाळपास सुरळीतपणा आल्यामुळे बहुतांशी काराखान्यांच्या साखर उताऱ्यात सुधारणा झाली आहे. यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. आंदोलनाशिवाय ऊस दर जाहीर व्हावा, यादृष्टीने नुकतीच शेतकरी संघटना, कारखान्याचे प्रतिनिधी यामध्ये बैठक झाली होती. 

यामध्ये अंतिम निर्णय न झाल्याने ३० तारखेला पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली होती. दरम्यान, अथणी-रयत कारखान्याने एफआरपीपेक्षा अधिक दर जाहीर करत नवा पॅटर्न निर्माण केला. या तीन कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी दराबाबत मौन बाळगत गाळप सुरू ठेवले आहे. 

ऊस उत्पादकांचे बैठकीकडे लक्ष सोमवारी (ता. ३०) कोणता तोडगा निघणार, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, अथनी-रयत कारखान्यांचा पॅटर्न स्वीकारला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साखरेस प्रतिक्विंटल ३१०० रुपये किमान विक्री भाव निश्चित असल्याने एकरकमी एफआरपी देणे शक्य असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. सोमवारी उसाच्या पहिल्या हप्त्याचे चित्र स्पष्ट होणार असल्याने ऊस उत्पादकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com