जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ नाही

जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.
There is no bird flu in Jalgaon district
There is no bird flu in Jalgaon district

जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. जिल्ह्यात २२६ कुक्कुटपालक आहेत. त्यांना तातडीने उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात बर्ड फ्लू नसल्याचा निर्वाळा जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. ए. एम. इंगळे यांनी दिला.  

परभणी जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’मुळे पक्षी दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृश्‍यप्रणालीद्वारे यंत्रणांचा आढावा घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. जमादार यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

तालुका आरोग्याधिकारी, पालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. तसेच बर्ड फ्लू आहे, की नाही, याची माहिती प्रशासनाने  तपासणी, पाहणी करून घेतली. 

  या दिल्या सूचना 

खबरदारी घेण्याचे आवाहन पोल्ट्री व्यावसायिकांना केले आहे.  दक्षता म्हणून आपल्या पोल्ट्रीफार्मचे सॅनिटायझेशन करून घ्यावे. जिल्ह्यातील कुठल्याही पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांची मर दिसून आल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे. असे पक्षी कुठेही विक्री करू नयेत. शिवाय हे पक्षी इतर पक्ष्यांमध्ये मिसळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

पालिका क्षेत्रात विक्री होणारे मांस पालिकेच्या पथकाने तपासावे. व्यावसायिकांशी पशुसंवर्धन विभागाने समन्वय साधून त्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असेही राऊत म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com