Agriculture news in Marathi There is no danger of ‘Shaheen’ | Agrowon

महाराष्ट्राला ‘शाहीन’चा धोका नाही

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021

अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. आज (ता. १) पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

पुणे : अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. आज (ता. १) पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पाकिस्तान, मकरान किनाऱ्याकडे जाणार आहे. परिणामी या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. त्यानंतर ही वादळी प्रणाली आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्राच्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून गुजरातकडे निघून गेली. गुरुवारी (ता. ३०) सकाळी अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र देवभूमी द्वारिकेच्या पश्‍चिमेकडे ६० किलोमीटर तर पाकिस्तानच्या कराचीपासून ८६० किलोमीटर आग्नेयेकडे अरबी समुद्रात होते. आज (ता. १) अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. 

अरबी समुद्रातील प्रणालीमुळे पश्‍चिमेकडे सरकून जाणार असली तरी गुजरातच्या किनाऱ्यालगत दोन दिवस उंच लाटा उसळण्याची तसेच ताशी ४० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मात्र या प्रणालीचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.

...त्यानंतरच मॉन्सूनचा परतीचा प्रवास शक्य
अरबी समुद्रातील वादळी प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर गेल्यानंतर ५ ऑक्टोबरपासून देशाच्या वायव्य भागात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणार आहेत. या परिसरात वाऱ्याची दिशा बदलणार असून, आर्द्रतेची टक्केवारी चांगलीच कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...