सांगलीत दुष्काळी तालुक्यातून टँकरची मागणी नाही

सांगलीत दुष्काळी तालुक्यातून टँकरची मागणी नाही
सांगलीत दुष्काळी तालुक्यातून टँकरची मागणी नाही

सांगली : जिल्ह्याच्या तासगाव, कवठेमहांकाळ व जत या दुष्काळी तालुक्यांतील जनता टँकरसाठी टाहो फोडत आहे. मात्र, गेल्या अकरा महिन्यांत तीन तालुक्यांतून टँकर मागणीचा एकही प्रस्तावच आला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या उन्हाळ्यात या तीन तालुक्यांतील भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. पाण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, तरीही टँकर सुरू केले नाहीत. या वेळीदेखील पावसाळ्याची सुरवात चांगली झाली; परंतु सरतेशेवटी सरासरीच्या ६० टक्केसुद्धा पाऊस झाला नाही. याच्या जोडीला सर्व प्रादेशिक योजना दीड वर्षापासून बंद आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना चार-चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहेत. वारंवार मागणी करूनही टँकर मिळत नसल्याने पदाधिकारी आणि जनतेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली आहे.

जलयुक्त शिवारच्या ब्रँडिंगसाठी टॅंकर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशा आरोपांच्या फैरी लोकप्रतिनिधींनी आढावा बैठकीत झाडल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. शासनाने गंभीर दुष्काळी जत तालुक्यातील १२३ गावे, तासगाव तालुक्यातील ६९, कवठेमहांकाळ तालुक्यातील ६० अशा २५२ पैकी एकही प्रस्ताव जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तालुक्यांंतूनच गेलेला नसल्याचे उघड झाले आहे.

११ महिन्यांत फक्त १५ प्रस्ताव

एक जानेवारी २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यांत जिल्ह्यातील एकाही तालुक्याने टँकरची मागणी केलेली नाही. ऑक्टोबरमध्ये खानापूर तालुक्यातील हिवरे, पळशी, बाणूरगड आणि बेणापूर तर आटपाडी तालुक्यातील आटपाडी, दिघंची, उंबरगाव, लेंगरेवाडी, पुजारवाडी (दि), बोंबेवाडी, पिंपरी (खुर्द), आंबेवाडी व आवळाई या १३ गावांतील प्रस्ताव आले होते. नोहेंबरमध्ये राजेवाडी आणि विभूतवाडी गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव आले होते ते मंजूर आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com