Agriculture news in Marathi, There is no financial provision for balloons | Agrowon

गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक तरतूदच नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या भागाला वरदान ठरू शकणाऱ्या गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांच्या बांधणीसंबंधी केंद्राने कुठलीही तरतूद नुकत्याच मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात केलेली नाही. यामुळे गिरणा पट्ट्यातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या भागाला वरदान ठरू शकणाऱ्या गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांच्या बांधणीसंबंधी केंद्राने कुठलीही तरतूद नुकत्याच मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात केलेली नाही. यामुळे गिरणा पट्ट्यातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

गिरणा नदीवर मेहुणबारे, भडगाव, पाचोरा, जळगाव या तालुक्‍यांमध्ये सात बलून बंधारे प्रस्तावित आहेत. यास केंद्राने प्रायोगिक प्रकल्प म्हणून मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार यासाठी निधी देणार आहे. अंतिम मंजुरी झाल्या असून, सुमारे ७३१ कोटी रुपये निधी लागणार आहे. हा प्रकल्प लवकरच हाती घेऊ, असे आश्‍वासन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी दिले होते. 

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकल्पासंबंधी सकारात्मक भूमिका घेतली. परंतु, नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातील बाबी नेमकेपणाने समोर येत आहेत. त्यात रेल्वे प्रकल्पांसाठी किती तरतूद झाली, रस्तेविकास यासंबंधीचे मुद्दे समोर येत आहेत. त्यात सिंचन प्रकल्पासंबंधीच्या बलून प्रकल्पासाठी कोणतीही तरतूद केलेली नसल्याचे समोर आले आहे. बलून बंधारे प्रकल्प भाजपचे तत्कालीन खासदार एम. के. अण्णा पाटील यांनी १९९८ मध्ये चर्चेत आणला होता. त्यासाठी ते पाठपुरावा करीत असल्याचेही अनेकदा सांगितले जायचे. अनेक निवडणुका झाल्या. परंतु, हा प्रकल्प अजूनही सुरू झालेला नसल्याची नाराजी गिरणा पट्ट्यातील शेतकरी, ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. 

बलून बंधाऱ्यांमुळे चार हजार हेक्‍टरला लाभ होईल. किमान १०० गावांमधील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होईल. पण, हा प्रकल्प नेमका हाती केव्हा घेतला जाईल, असा प्रश्‍न शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...