agriculture news in marathi, There is no guarantee for MSP in Jalgaon market committee | Agrowon

जळगाव बाजार समितीत हमीभाव मिळेना
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्ह्यातील अग्रगण्य व सर्वांत मोठी असलेली जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव मिळत नसल्याने बदनाम होत असून, शेतकऱ्यांमध्ये तक्रारी आहेत. मुगाची पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू आहे. कमी दर्जाचा शेतीमाल म्हणून हा प्रकार सुरू असून, संबंधित शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव : जिल्ह्यातील अग्रगण्य व सर्वांत मोठी असलेली जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव मिळत नसल्याने बदनाम होत असून, शेतकऱ्यांमध्ये तक्रारी आहेत. मुगाची पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू आहे. कमी दर्जाचा शेतीमाल म्हणून हा प्रकार सुरू असून, संबंधित शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेतल्याची माहिती मिळाली आहे.

खरेदीविषयीच्या दंड व शिक्षेच्या तरतुदीचा अध्यादेश शासनाने काढलेला नाही. व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरू ठेवावेत, असे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ (पुणे) यांनी सांगितले आहे. त्यानुसार व्यापारी खरेदी करीत अाहेत. सध्या बाजारात मुगाला ५ हजारांहून अधिक दर नाहीत, असा खुलासा बाजार समितीने केला आहे. मुगाला प्रतिक्विंटल ६ हजार ४७५ रुपये, असा हमीभाव शासनाने जाहीर केला आहे.

चांगल्या दर्जाच्या शेतीमालास हमीभाव दिलाच पाहीजे. दर्जेदार मालास कमी दर्जाचा सांगून त्याची कमी दरात खरेदी होत असल्यासर कारवाई केली जाईल. त्यासाठी ज्या शेतकऱ्याची फसवणूक झाली, त्याने प्रशासनाकडे खरेदी पावत्या व इतर बाबी सादर करून तक्रार करावी, असे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी म्हटले आहे.

बाजार समितीत उडदाची आवक पुढील आठवड्यात सुरू होईल. सध्या आसोदा, भादली, नशिराबाद, म्हसावद, पाचोरा भागातून मुगाची आवक सुरू आहे. ती या आठवड्यात प्रतिदिन ३० ते ३२ क्विंटल एवढी आहे. इतर कुठल्याही शेतीमालाची आवक शेतकऱ्यांकडून होत नसल्याची स्थिती आहे. व्यापारी ते व्यापारी यांच्यात डाळी, सोयाबीनचे व्यवहार मात्र सुरू आहेत. त्यांची नेमकी नोंदणी बाजार समितीकडे नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, हमीभावात खरेदीसंबंधीचे दंड व शिक्षेचा अध्यादेश संबंधित विभागाकडून आलेला नाही. शासन खुल्या बाजारात ३२०० रुपये प्रतिक्विंटलने उडदाची विक्री करीत आहे. याच शासनाने उडदाचा हमीभाव यापेक्षा अधिक जाहीर केला आहे. तुरीचा हमीभाव ५४०० रुपये जाहीर केला. मात्र, तूरडाळ ३५ रुपये प्रतिकिलोने विकावी लागत आहे. कायद्याचा धाक दाखविणे सुरूच राहिल्‍यास बाजार समितीमध्ये शेतीमालाची खरेदीच होणार नाही. शेतीमाल घरी परत घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल. शेतकरी व खरेदीदारांमध्ये समन्वय साधून तडजोडीने काम करावे लागेल.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...