मराठवाड्यात खरिपात उद्दिष्टानुसार कर्जवाटप नाही

पाच जिल्ह्यांत खरिपात उद्दिष्टानुसार कर्जवाटप नाही
पाच जिल्ह्यांत खरिपात उद्दिष्टानुसार कर्जवाटप नाही

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत खरीप पीक कर्जवाटप उद्दिष्टाच्या तुलनेत ५० टक्‍केही झाले नाही. शिवाय दुष्काळाच्या झळांनी मराठवाड्यात होरपळ वाढली असल्याने आता रब्बीच्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकपूर्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ हजार ८४८ कोटी २ लाख रुपये खरीप पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक देण्यात आला होता. प्रत्यक्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, व्यापारी बॅंक व ग्रामीण बॅंक शाखांनी सप्टेंबर २०१८ अखेर केवळ ३ लाख ८५ हजार ६३६ शेतकऱ्यांना केवळ २२४७ कोटी ८१ लाख ५२ हजार रुपयांचे अर्थात उद्दिष्टाच्या केवळ ४६ टक्‍केच कर्जवाटप केले. यामध्ये सर्वाधिक खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट असलेल्या व्यापारी बॅंकांनी उद्दिष्टाच्या केवळ ४० टक्‍केच कर्जवाटप करून हात आखडता घेतला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखांनाही उद्दिष्टाच्या केवळ ४० टक्‍के तर ग्रामीण बॅंक शाखांनी उद्दिष्टाच्या ८७ टक्‍के कर्जवाटप केल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी २८ टक्‍के, परभणी जिल्ह्यात २९ टक्‍केच खरीप पीककर्जाचे वाटप करण्यात आले. जालना जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ६९ टक्‍के तर औरंगाबाद जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ५७ टक्‍के खरीप पीक कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्जमाफीचा विषय अजूनही संपला नसल्याची स्थिती आहे हे विशेष.

रब्बीसाठी ११७८ कोटी ४० लाख रुपये वाटपाचा लक्ष्यांक एकीकडे औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांत खरीप पीक कर्जवाटपात सरासरी ५० टक्‍केही कर्जवाटप झाले नाही.

जिल्हानिहाय खरीप कर्जवाटप उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जवाटप (आकडे लाखात)
जिल्हा उद्दिष्ट प्रत्यक्ष वाटप
औरंगाबाद ११५९४८.७० ६६१८६.६०
जालना १२५९१०.०० ८७२४८.८०
परभणी १४७०४४.१२ ४४०२७.८५
हिंगोली ९५९००.०० २७३१८.२७
बॅंकनिहाय उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जवाटप (आकडे लाखात)
बॅंक उद्दिष्ट प्रत्यक्ष वाटप
जिमस ८१६१६.०९ ३३३७२.१७
व्यापारी बॅंक ३४०५८१.४१ १३६८२०.७९
ग्रामीण बॅंक ६२६०५.३२ ५४५८८.५६
जिल्हानिहाय खरीप कर्ज मिळालेल्या सभासदांची संख्या
औरंगाबाद १०६८६८
जालना १३८५७७
परभणी ८३३८५
हिंगोली ५६८०६
बॅंकनिहाय रब्बी कर्जवाटप उद्दिष्ट (आकडे लाखात)
बॅंक उद्दिष्ट
जिमस २७६५५.०८
व्यापारी बॅंक ७६८२५.३०
ग्रामीण बॅंक १३३६०.२६
जिल्हानिहाय रब्बी कर्जवाटप उद्दिष्ट (आकडे लाखात)
औरंगाबाद ४९६९२.३०
जालना २०९०१.००
हिंगोली १५९००.००
परभणी ३१३४७.३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com