Agriculture news in Marathi There is no outbreak of bird flu in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव नाही

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

देशातील काही राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’मुळे पक्षी दगावले आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘बर्ड फ्लू’चा संभाव्य प्रादुर्भाव होवू नये यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी दक्षता म्हणून आपल्या पोल्ट्रीफार्मचे सॅनिटायझेशन करून घ्यावे. जिल्ह्यातील कुठल्याही पोल्ट्रीमध्ये पक्षांची मर दिसून आल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे, असे पक्षी कुठेही विक्री करू नये शिवाय हे पक्षी इतर पक्षांमध्ये मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी.

तपासणी करा
याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. नगरपालिका क्षेत्रात जेथे मोठे मार्केट आहे. तेथील विक्री होणारे मांस नगरपालिकेच्या पथकाने तपासण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. जळगाव जिल्ह्यात सध्या अंदाजे २२६ पोल्ट्री फार्म आहेत. या व्यावसायिकांशी पशुसंवर्धन विभागाने समन्वय साधून त्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभाग आवश्यक ती दक्षता घेत असून यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आल्याचे जिल्हा उपायुक्त शाम पाटील यांनी सांगितले. तसेच ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून तूर्त जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका नसल्याचे ए. डी. पाटील यांनी बैठकीत सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...