लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट सचिव

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लागू झालेल्या लॉकडाऊनची कालमर्यादा वाढविण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही.
corona
corona

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लागू झालेल्या लॉकडाऊनची कालमर्यादा वाढविण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही, असे स्पष्टीकरण केंद्रातर्फे सोमवारी (ता.३०) देण्यात आले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात कोरोना बाधित यांची संख्या १०७१ वर पोहोचली असून मध्ये वाढ झाली आहे आणि आठ जणांचा मृत्यू झाला आहे त्याच वेळी कुणाच्या विळख्यातून आणि पूर्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०० वर पोहोचली आहे.  मोदी सरकार सध्याचे लॉकडाऊन ३ महिन्यांपर्यंत वाढवणार, असे संकेत देणारे वृत्त काही वाहिन्यांवरून सातत्याने देण्यात येत होते. त्याचा केद्राने स्पष्ट इन्कार केला आहे. मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सोमवारी (ता.३०) सकाळीच ट्विट करून माध्यमातील याबाबतच्या बातम्या निराधार असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले.  आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केरोना दुसरा टप्पा देशात सुरू आहे. सामूहिक संक्रमणाचे प्रमाण आटोक्यात असल्याने देशात तिसर्या टप्प्यात प्राणहानी मोठ्या प्रमाणावर होऊ नये या दृष्टीने केंद्राचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊनचे कडक पालन करावे अन्यथा त्याचा उद्देशच नष्ट होईल असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की कोरोनापासून संरक्षण करणारी वैयक्तिक संरक्षक उपकरणे म्हणजे पीपीईची संख्या देशात उपलब्धतेनुसार वाढवण्यात येत आहे. देशभराच्या विविध रुग्णालयांमध्ये सध्या ३, ३४, ००१ पीपीटी उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांकडे २१ लाखांची पी पी ई ची मागणी नोंदवण्यात आली आहे. रेड क्रॉस सोसायटीनेही देशाबाहेरून १०००० उपकरणांची मागणी नोंदवली आहे.

आयसीएमआर चे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी सांगितले, की आतापावेतो हे द्वारे ३८ हजार ४४२ जणांच्या चाचण्या करण्यात आले आहेत रविवारी एका दिवसात ३५ चे चाचण्या करण्यात आल्या आणि संस्थेच्या क्षमतेच्या के चाचण्या सध्या करण्यात येत आहेत. दिल्लीतील एम्स न आपल्या ट्रॉमा सेंटरचे रूपांतर कोरोना रूग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला यात २६० रुग्णांची व्यवस्था केली जाईल. सध्या या ट्रामा सेंटरमध्ये ७० व्हेंटिलेटर असून ते १०० आणि नंतर त्यापेक्षाही जास्त वाढवण्याचे नमूद केले. कोरोनाग्रस्तांच्या रक्त आणि थुंकीचे नमुने तपासणी करण्यासाठी केंद्राने देशभरातील वैज्ञानिकांना मंजुरी दिली आहे.  दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की २० एप्रिल पर्यंत बी एस एन एल चा प्रिपेड ग्राहकांची सेवा अबाधित ठेवण्यात येणार असून काही प्रीपेड त्यांना अतिरिक्त देण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज जाहीर केले की सीए आर केंद्रीय विद्यापीठे यूजीसी जेईई सारख्या परीक्षांसाठी प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख एका महिन्याने वाढविण्यात आली आहे.  दरम्यान राजधानी दिल्लीतील मजुरांच्या पलायनाची भयावह परिस्थिती कायम आहे. काल राज्याच्या शेकडो निवाराग्रहांमध्ये या मजुरांची व्यवस्था केली. मात्र तेथूनही पलायन करण्यासाठी या मजुरांमध्ये ओढ लागल्याचे चित्र आहे. निजामुद्दीन परिसरात २०० संशयितांचे विलगीकरण करण्यात आले आहे. दिल्लीत तबलीगी जमातीच्या एका कार्यक्रमात एक हजार लोक सामील झाले होते आणि या अनुषंगाने सरकारने आता हुडकून काढून विलगीकरण कक्षांमध्ये पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com