राज्यात स्वतंत्र कृषिमंत्री नाही, ही शोकांतिका ः थोरात

राज्यात स्वतंत्र कृिषमंत्री नाही, ही शोकांतिका ः थोरात
राज्यात स्वतंत्र कृिषमंत्री नाही, ही शोकांतिका ः थोरात

नगर ः शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी पूर्णपणे उदासिन असलेल्या या सरकारच्या कृषी खात्याला स्वतंत्र मंत्री नाही ही शोकांतिका आहे. मात्र, तरीही सशक्त राज्यासाठी कृषी क्षेत्राला ताकद देणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात अधिकाधिक संशोधन झाले पाहिजे, असे मत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. 

आर. के. फाउंडेशनच्या वतीने कृषिभूषण स्व. रावसाहेब कडलग स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘कृषिक्रांती पुरस्कार’चे शनिवारी (ता. २२) संगमनेर (जि. नगर) येथे झाले. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, डॉ. शरद गडाख, प्राचार्य शिवाजीराव देवढे, संगमनेर बार कौन्सील अध्यक्ष ॲड. वाय. बी. हासे चंद्रकांत कडलग, मोहन देशमुख, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र कडलग यांनी. स्मिता गुणे यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र कडलग यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com