लासूर (ता. चोपडा, जि.
ताज्या घडामोडी
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत उपाययोजना नाही
नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला त्यापासून कसे वाचवायचे, याबाबत विद्यापीठे, कृषी विभागाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. शेतकऱ्यांनी काय करावे, याबाबत कसलीही माहिती दिली जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. लष्करी अळी नियंत्रणात आली नाही, तर मोठा फटका ज्वारी उत्पादकांना सोसावा लागणार आहे.
नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला त्यापासून कसे वाचवायचे, याबाबत विद्यापीठे, कृषी विभागाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. शेतकऱ्यांनी काय करावे, याबाबत कसलीही माहिती दिली जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. लष्करी अळी नियंत्रणात आली नाही, तर मोठा फटका ज्वारी उत्पादकांना सोसावा लागणार आहे.
नगर जिल्ह्यामध्ये खरिपात मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. त्याचा थेट फटका उत्पादकांना बसला. कृषी विभागाने मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट बांधावर जाऊन माहिती पुरवली. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. फार प्रमाणात नाही. परंतु, काहीसा प्रादुर्भाव रोखता आला. खरिपातील मक्यावरील लष्करी अळी आता रब्बीतील ज्वारीवर पडणार असल्याचे तज्ज्ञच सांगत होते.
रब्बीत सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे असते. सरासरी पाच लाख हेक्टर क्षेत्र असलेल्या ज्वारीची आत्तापर्यंत दोन लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड, नगर, पारनेर, संगमनेर, कोपरगाव तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. आत्ता मक्याप्रमाणे ज्वारीवर काही भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले असून, सध्या पेरणी झालेल्या क्षेत्राच्या साधारण १५ ते २० टक्के क्षेत्रावर प्रादुर्भाव दिसत आहे.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव थांबला नाही तर मक्याप्रमाणेच मोठा फटका उत्पादकांना सोसावा लागणार असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र, अजून त्याबाबत कसल्याही सरकारी पातळीवर हालचाली झाल्या नाहीत.
ज्वारीवरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, याची शेतकऱ्यांना माहिती देण्यासह प्रात्यक्षिके करणे गरजेचे असताना सरकारी यंत्रणांनी काहीही प्रयत्न केले नसल्याने नगर जिल्ह्यामधील ज्वारी उत्पादक चिंतेत आहेत.
कृषी विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करून लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- शिवराज कापरे,
अध्यक्ष, शेतकरी विकास मंडळ