Agriculture News in Marathi There is no subsidy for gram varieties above ten years | Page 2 ||| Agrowon

दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाही

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटताना दहा वर्षांवरील वाणांसाठी अनुदान देण्यात येऊ नये, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. शासकीय संस्थांकडे यंदा भरपूर बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा लागवडीला चालना मिळेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
 

पुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटताना दहा वर्षांवरील वाणांसाठी अनुदान देण्यात येऊ नये, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. शासकीय संस्थांकडे यंदा भरपूर बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा लागवडीला चालना मिळेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

यंदा दहा वर्षांच्या आतील हरभरा बियाणे वाणांना प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये अनुदान देखील मिळेल. राज्याचे कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) यांनी एका आदेशात बियाणे पुरवठ्याच्या नियोजनाबाबत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. 

‘‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात हरभरा पिकाच्या दहा वर्षांवरील वाणांसाठी दिलेले यापूर्वीचे आर्थिक लक्ष्यांक काढून टाकावे. मात्र हेच लक्ष्यांक दहा वर्षांच्या आतील वाणांच्या वाटपासाठी वर्ग करण्यात यावे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नव्या वाणांचे प्रमाणित बियाणे मिळू शकेल,’’ अशा सूचना श्री. पाटील यांनी सर्व जिल्ह्यांना दिल्या आहेत

चालू रब्बी हंगामात महाडीबीटी संकेतस्थळावर हरभरा बियाणे मिळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना फक्त दहा वर्षांच्या आतील बियाणे देण्याचे बंधन असेल. त्यासाठी संबंधित बियाणे पुरवठादारांकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा वेळेत होईल, याची दक्षता संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला घ्यावी लागणार आहे. 

अनुदानित बियाणे मिळवण्यास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडून गावच्या कृषी सहायकाला मिळणार आहे. कृषी सहायकाने शेतकऱ्यांना बियाणे परमीट वाटायचे असून, शेतकऱ्याने तेच परमीट संबंधित बियाणे विक्रेत्यांकडे जमा करायचे आहे. अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित पैसे शेतकऱ्याला भरावे लागेल. त्यानंतर विक्रेत्याकडून शेतकऱ्याला पैसे भरल्याची पावती आणि अनुदानित बियाणे मिळणार आहे.

शेतकरी उत्पादक संस्थांकडून 
बियाणे घेता येणार

शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडे पुरेसे बियाणे नसल्यास शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादक संस्थांकडून बियाणे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या कंपन्यांनी तयार केलेल्या प्रमाणित बियाण्यांची तपासणी केल्याचे अहवाल बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून मिळवावेत, अशाही सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...