agriculture news in marathi, There is no Vitthal Darshan in Pandharpur without Darshanbari | Agrowon

पंढरपुरात दर्शनबारीशिवाय विठ्ठल दर्शन नाही

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

सोलापूर  : पंढरपुरात आषाढी वारी सोहळा १३ ते २७ जुलै कालावधीत होणार आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या लक्षात घेता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी केलेल्या दर्शनबारीशिवाय मंदिराभोवती असलेल्या कोणत्याही इमारतीच्या दरवाजातून मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी काढला आहे.  पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक वारकरी दर्शनासाठी येतात.

सोलापूर  : पंढरपुरात आषाढी वारी सोहळा १३ ते २७ जुलै कालावधीत होणार आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या लक्षात घेता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी केलेल्या दर्शनबारीशिवाय मंदिराभोवती असलेल्या कोणत्याही इमारतीच्या दरवाजातून मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी काढला आहे.  पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक वारकरी दर्शनासाठी येतात. त्यामुळे १३ ते २७ जुलै या आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (४) अन्वये सदर आदेश लागू करण्यात आले आहेत.

आदेशानुसार विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर सार्वजनिक पूजा व इतर धार्मिक विधीच्या वेळा सोडून भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे. मंदिर समितीने केलेल्या दर्शनबारीतूनच भाविकांना दर्शनाला सोडले जाईल. अन्य कोणत्याही दरवाजातून सोडण्यात येणार नाही. महिलांसाठी वेगळी दर्शनरांग नाही. उत्तर दरवाजातील व्हीआयपी गेटने फक्त समिती निमंत्रित पाहुणे तसेच मंदिर समितीने परवानगी दिलेल्या निमंत्रित व्यक्तींनाच मंदिर समितीच्या प्रतिनिधीने खात्री करून दिल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांनी मुखदर्शनानंतर उत्तर दरवाजातूनच बाहेर पडावे. तसेच पश्‍चिम दरवाजासमोरच्या मोकळ्या जागेत गर्दी होणार नाही याचीही दक्षता भाविकांनी घ्यावी.

मंदिराच्या सोळखांबीजवळ उत्तरेकडील दरवाजानेही भाविकांना येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दर्शनबारीनुसार भाविकांना दर्शन मिळावे यासाठी  नियोजन करून मंदिराच्या आतील सर्व दरवाजे बंद ठेवण्यात यावेत, हे दरवाजे आपत्कालीनप्रसंगी व प्रशासकीय कामाच्या आवश्‍यकतेनुसार उघडण्यात येणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार...सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसरत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या...
चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवातकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...