Agriculture news in marathi There should be a concerted effort for the empowerment of tribals: Padvi | Agrowon

आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी एकत्र प्रयत्न व्हावे : पाडवी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

नाशिक  ः ‘‘आदिवासी बांधवांना रोख अर्थव्यवस्थेचे ज्ञान कमी आहे. त्यांना योग्य दिशेने नेऊन स्वत:च्या पायावर सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे.``

नाशिक  ः ‘‘आदिवासी बांधवांना रोख अर्थव्यवस्थेचे ज्ञान कमी आहे. त्यांना योग्य दिशेने नेऊन स्वत:च्या पायावर सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे,’’ असे आवाहन आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी केले. 

‘आदिवासी गौरव दिना’चा राज्यस्तरीय कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने व्हिडीओ कॉन्फिरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला. आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, मुंबईहून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, नाशिकचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, आदिवासी अपर आयुक्त गिरीष सरोदे, व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील उपस्थित होते. राज्यभरातून सुमारे दोन हजार आदिवासी बांधव यावेळी सहभागी झाले. 

पाडवी म्हणाले, ‘‘आदिवासी बांधवांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी ‘आदिवासी हित संरक्षण कक्ष’ स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल व इतर आजरांपासून आदिवासींचे रक्षण करण्यासाठी ‘आदिवासी आरोग्य संवर्धन कक्ष’याची निर्मिती करण्यात येणार आहे. आदिवासींचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध असल्याने या जमातीसाठी निर्सगाशी संबंधित त्रैमासिक सुरु करा.’’आदिवासी जमातीच्या वैचारिक जडण-घडणीसाठी हा दिवस ‘आदिवासी विकास मंथन दिवस’म्हणून साजरा करावा, असे पाडवी म्हणाले.

धान खरेदीसाठी गोडाऊन वाढवा

येणाऱ्या काळात धान साठविण्यासाठी गोडावून विस्ताराने वाढवावीत. तसेच आदिवासी सोसायट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावा. वनपट्ट्याच्या जमिनी वाटप करण्याबरोबर त्यांचे सपाटीकरण करणे व इतर अनुषंगिक गोष्टींवर भर द्यावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केल्या. 
 


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...