नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणी क्षेत्रात तिप्पट वाढ

 there is a threefold increase in gram sowing area in Nanded district
there is a threefold increase in gram sowing area in Nanded district

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली. त्यामुळे जिल्ह्यात हरभऱ्याच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पेरणी क्षेत्रामध्ये तीन पटीहून अधिक वाढ झाली आहे.

एकूण १ लाख ९० हजार ११४ हेक्टरवर (३०४.९२ टक्के) पेरणी झाली आहे. बुधवार (ता. २२) पर्यंत २ लाख ६१ हजार ६५७ हेक्टरवर म्हणजेच १९१.३९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही भागांत उशिरापर्यंत पेरणी सुरू होती. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील रब्बीचे पेरणी क्षेत्र अद्याप अंतिम करण्यात आलेले नाही.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यामध्ये रब्बी ज्वारीच्या सर्वसाधारण २६ हजार ९७५ हेक्टर, गव्हाचे ३८ हजार ५३८ हेक्टर, मक्याचे ३ हजार १७८ हेक्टर, हरभऱ्याचे ६२ हजार ३४९ हेक्टर, करडईच्या ४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. 

जिल्ह्यात खरिपातील सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. त्यानंतर हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील नगदी पीक असलेल्या हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली. अन्नधान्य आणि चारा पीक म्हणून ज्वारीचे महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ज्वारीलाही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यंदा ज्वारीने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. गव्हाची पेरणी ८३ टक्क्यांच्या वर झाली आहे.

करडईच्या क्षेत्रातील घट यंदाही कायम आहे. जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड हे दोन तालुके वगळता अन्य १४ तालुक्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

पीकनिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र  पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी २६९७५ ३०३५१  ११२.५२
गहू    ३८५३८ ३२३२१  ८३.८७
मका  ३१७८ ३४०७ १०७.२१
हरभरा ६२३४९ १९०११४   ३०४.९२
करडई ४७६८ १७०३   ३५.७२
सूर्यफूल  ९४ २४ २५.५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com