मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६० उड्डाणे

दैनंदिन ६६० उड्डाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ मार्च २०२२ पर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६० उड्डाणे
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६० उड्डाणे

मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने विमानसेवा पूर्ववत होत आहेत. प्रवासी वाढल्याने विमानसेवांच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. मुंबई विमानतळानेही दैनंदिन फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून विमानतळ प्रशासनाने बुधवारी हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार दैनंदिन ६६० उड्डाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ मार्च २०२२ पर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

कोरोना नियंत्रणात आल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. या वाढीव प्रवाशांना सामावून घेण्यासह अधिकाधिक मार्ग खुले करण्याच्या दृष्टीने या वेळापत्रकाची आखणी करण्यात आली आहे. उन्हाळी हंगामाच्या तुलनेत हिवाळ्यात ३५ टक्के फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबई विमानतळावरून दररोज ६६० विमाने ये-जा करतील आणि त्याच तुलनेत प्रवासीसंख्याही वाढली आहे.

२०१९ मध्ये फक्त ६५७ तर २०२० मध्ये २२२ विमान फेऱ्या घटल्या होत्या. दैनंदिन फक्त ४३५ फेऱ्यांचे उड्डाण झाले होते. मात्र, या वर्षी पहिल्यांदा ६६० दैनंदिन फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. या वर्षी गेल्या तीन वर्षांतील विक्रम मोडून काढला असून, गेल्या दोन्ही हंगामात दिल्ली, गोवा, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईला सर्वाधिक प्रतिसाद लाभला होता. चालू हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढ अपेक्षित असल्याचे मुंबई विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रवासी वाढणार  गेल्या वर्षी २०२० मध्ये हिवाळी हंगामात इंडिगोने २१ हजार ३५, एअर इंडिया ६ हजार ७७४, स्पाइसजेट ५ हजार ८५५, विस्तारा ४ हजार ९११ आणि गो फर्स्टने सरासरी ४ हजार ६४५ प्रवाशांना दैनंदिन सेवा दिली होती. तर त्यापूर्वी २०१९ मध्ये इंडिगोची सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या ३८ हजार ६४१, स्पाइसजेट २० हजार ३९० आणि गो फर्स्टची संख्या १३ हजार १८३ इतकी नोंदविण्यात आली होती. मात्र, चालू हंगामात प्रवासी संख्या कोरोना पूर्वकाळापेक्षा जास्त जाईल, अशी अपेक्षा मुंबई विमानतळाने व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com