agriculture news in marathi There will be 660 daily flights from Mumbai Airport | Agrowon

मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६० उड्डाणे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

दैनंदिन ६६० उड्डाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ मार्च २०२२ पर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने विमानसेवा पूर्ववत होत आहेत. प्रवासी वाढल्याने विमानसेवांच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. मुंबई विमानतळानेही दैनंदिन फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून विमानतळ प्रशासनाने बुधवारी हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार दैनंदिन ६६० उड्डाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ मार्च २०२२ पर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

कोरोना नियंत्रणात आल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. या वाढीव प्रवाशांना सामावून घेण्यासह अधिकाधिक मार्ग खुले करण्याच्या दृष्टीने या वेळापत्रकाची
आखणी करण्यात आली आहे. उन्हाळी हंगामाच्या तुलनेत हिवाळ्यात ३५ टक्के फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबई विमानतळावरून दररोज ६६०
विमाने ये-जा करतील आणि त्याच तुलनेत प्रवासीसंख्याही वाढली आहे.

२०१९ मध्ये फक्त ६५७ तर २०२० मध्ये २२२ विमान फेऱ्या घटल्या होत्या. दैनंदिन फक्त ४३५ फेऱ्यांचे उड्डाण झाले होते. मात्र, या वर्षी पहिल्यांदा ६६० दैनंदिन फेऱ्या
नियोजित करण्यात आल्या आहेत. या वर्षी गेल्या तीन वर्षांतील विक्रम मोडून काढला असून, गेल्या दोन्ही हंगामात दिल्ली, गोवा, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईला
सर्वाधिक प्रतिसाद लाभला होता. चालू हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढ अपेक्षित असल्याचे मुंबई विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रवासी वाढणार 
गेल्या वर्षी २०२० मध्ये हिवाळी हंगामात इंडिगोने २१ हजार ३५, एअर इंडिया ६ हजार ७७४, स्पाइसजेट ५ हजार ८५५, विस्तारा ४ हजार ९११ आणि गो फर्स्टने
सरासरी ४ हजार ६४५ प्रवाशांना दैनंदिन सेवा दिली होती. तर त्यापूर्वी २०१९ मध्ये इंडिगोची सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या ३८ हजार ६४१, स्पाइसजेट २० हजार
३९० आणि गो फर्स्टची संख्या १३ हजार १८३ इतकी नोंदविण्यात आली होती. मात्र, चालू हंगामात प्रवासी संख्या कोरोना पूर्वकाळापेक्षा जास्त जाईल, अशी अपेक्षा
मुंबई विमानतळाने व्यक्त केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...