There will be 8483 agricultural schools during the rabbi season
There will be 8483 agricultural schools during the rabbi season

रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा 

रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ८४८३ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत. सर्वांत जास्त म्हणजे जवळपास सव्वापाच हजार शेतीशाळा एकट्या हरभरा पिकासाठी घेतल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ८४८३ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत. सर्वांत जास्त म्हणजे जवळपास सव्वापाच हजार शेतीशाळा एकट्या हरभरा पिकासाठी घेतल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

हरभऱ्यासाठी ५३७९, मका २८६, ज्वारी ७२७, ऊस ८५, तर इतर पिकांसाठी २००५ शेताशाळा घेतल्या जातील. सर्वांत जास्त शेतीशाळा बीड जिल्ह्यात होत असून, त्यांची संख्या ६७१ असेल. त्या खालोखाल नांदेडला ६०५, जळगाव ५९० व जालना भागात ५७४ शेतीशाळा होतील. सर्वांत जास्त शेतीशाळा हरभऱ्याच्या होत असून, त्यात लातूर विभागात १४३९ तर अमरावती विभागात १८२८ शेतीशाळा होतील. 

शेतीशाळांची जबाबदारी कृषी सहायक व पर्यवेक्षकांवर देण्यात आलेली आहे. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पुरस्कारदेखील दिले जाणार आहेत. शेतीशाळा घेताना गटशेतीचे गट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहेत. त्यांना कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांसह पुरस्कारप्राप्त शेतकरी, प्रयोगशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन व्हावे. त्यातून शेतीशाळेतील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, असा हेतू या संकल्पनेचा आहे. शेतीशाळेतून प्रक्रिया आणि बाजारमूल्य साखळी निर्माण होण्यासाठी चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अर्थात, ही चालना देण्यासाठी नेमके काय करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

हरभरा पिकासाठी घाटे अळी, मर तर मका व ज्वारीसाठी नवीन लष्करी आळीसाठी, उसात हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याच चार पिकांसाठी रब्बी हंगामात क्रॉपसॅप प्रकल्प राबविला जाईल. त्याअंतर्गत कीड व रोगाचे सर्वेक्षण आणि त्यानंतर सल्ला दिला जाणार आहे. त्यासाठी २५ कोटी रुपये खर्च केले जातील. कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात ८८५ मंडळ कृषी अधिकारी, ११७० पर्यवेक्षक आणि १०,६२० कृषी सहायक असे १३ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी होत आहेत. प्रशिक्षणासाठी या कर्मचाऱ्यांवर प्रतिदिन प्रतिकर्मचारी ५० रुपये खर्च केले जाणार आहेत. 

कामगंध सापळे वाटणार शेतकऱ्यांना क्रॉपसॅप प्रकल्पातून १.२१ लाख कामगंध सापळे वाटले जाणार आहेत. त्यासाठी ३.६३ लाख नग आमिष (ल्यूर) वस्तू वाटली जाईल. त्यात हरभऱ्यासाठी २.६५ लाख, ज्वारीसाठी ६३ हजार तर मक्यासाठी ३४ हजार सापळे किंवा आमिष वस्तूंचा समावेश असेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com