कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदी

देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात मालाचे साठे नोंदविण्यासाठी संगणक प्रणाली वापरण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जुनाट नोंदवह्यांच्या प्रथेवर वर्षानुवर्षे विसंबून असलेल्या विक्रेत्यांना ‘डिजिटल’ नोंदी बाळगण्याचा उत्तम आता पर्याय मिळाला आहे.
There will be computerized records of pesticide stocks
There will be computerized records of pesticide stocks

पुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात मालाचे साठे नोंदविण्यासाठी संगणक प्रणाली वापरण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जुनाट नोंदवह्यांच्या प्रथेवर वर्षानुवर्षे विसंबून असलेल्या विक्रेत्यांना ‘डिजिटल’ नोंदी बाळगण्याचा उत्तम आता पर्याय मिळाला आहे. 

केंद्राने १९७१ च्या कीडनाशके नियमातील १५ व्या तरतुदीत सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार देशातील कोणताही विक्रेता आता कीडनाशकांचा साठा नोंदवून ठेवण्यासाठी हस्तलिखित वह्यांबरोबरच संगणकीय प्रणालीचादेखील वापर करू शकणार आहे. तशी अधिसूचना कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव आश्‍विनी कुमार यांनी जारी केली आहे. 

किचकट हस्तलिखित कामांपासून सुटका  कीटकनाशकांच्या नोंदी संगणकीय पद्धतीने घेण्यास कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे केवळ विक्रेतेच नव्हे; तर कीडनाशके व कच्च्या मालाची आयात करणाऱ्या संस्था, उत्पादक कंपन्या आणि वितरक यांचीदेखील हस्तलिखित नोंदीच्या किचकट कामापासून सुटका  होणार आहे. संगणकीय साठेनोंदी जतन करण्यास सोयिस्कर ठरेल. सरकारी यंत्रणेला तपासणी करण्याच्या प्रक्रियेत हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासमोर निविष्ठा विक्रेत्यांच्या संघटनांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे हा प्रश्‍न कायमचा मार्गी लागला आहे. संगणकीय नोंदी कायदेशीर ठरविणाऱ्या या निर्णयाचे ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री, प्रवीणभाई पटेल, महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स असोसिएशनचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ पाटील, सत्यनारायण कासट यांनी स्वागत केले आहे. देशभरातील जवळपास एक लाख विक्रेत्यांना या निर्णयाचा फायदा होईल, असे या संघटनांनी स्पष्ट केले.

कीडनाशके विक्रेत्यांना संगणकीय नोंदी ठेवण्यास मान्यता मिळण्यासाठी आम्ही चार वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. या प्रयत्नांना यश आल्याने आता हाच नियम बियाणे व खते विक्रीबाबत लागू करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे धरला जाईल. - मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com