Agriculture news in Marathi There will be computerized records of pesticide stocks | Agrowon

कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात मालाचे साठे नोंदविण्यासाठी संगणक प्रणाली वापरण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जुनाट नोंदवह्यांच्या प्रथेवर वर्षानुवर्षे विसंबून असलेल्या विक्रेत्यांना ‘डिजिटल’ नोंदी बाळगण्याचा उत्तम आता पर्याय मिळाला आहे. 

पुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात मालाचे साठे नोंदविण्यासाठी संगणक प्रणाली वापरण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जुनाट नोंदवह्यांच्या प्रथेवर वर्षानुवर्षे विसंबून असलेल्या विक्रेत्यांना ‘डिजिटल’ नोंदी बाळगण्याचा उत्तम आता पर्याय मिळाला आहे. 

केंद्राने १९७१ च्या कीडनाशके नियमातील १५ व्या तरतुदीत सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार देशातील कोणताही विक्रेता आता कीडनाशकांचा साठा नोंदवून ठेवण्यासाठी हस्तलिखित वह्यांबरोबरच संगणकीय प्रणालीचादेखील वापर करू शकणार आहे. तशी अधिसूचना कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव आश्‍विनी कुमार यांनी जारी केली आहे. 

किचकट हस्तलिखित कामांपासून सुटका 
कीटकनाशकांच्या नोंदी संगणकीय पद्धतीने घेण्यास कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे केवळ विक्रेतेच नव्हे; तर कीडनाशके व कच्च्या मालाची आयात करणाऱ्या संस्था, उत्पादक कंपन्या आणि वितरक यांचीदेखील हस्तलिखित नोंदीच्या किचकट कामापासून सुटका 
होणार आहे. संगणकीय साठेनोंदी जतन करण्यास सोयिस्कर ठरेल. सरकारी यंत्रणेला तपासणी करण्याच्या प्रक्रियेत हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासमोर निविष्ठा विक्रेत्यांच्या संघटनांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे हा प्रश्‍न कायमचा मार्गी लागला आहे. संगणकीय नोंदी कायदेशीर ठरविणाऱ्या या निर्णयाचे ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री, प्रवीणभाई पटेल, महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स असोसिएशनचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ पाटील, सत्यनारायण कासट यांनी स्वागत केले आहे. देशभरातील जवळपास एक लाख विक्रेत्यांना या निर्णयाचा फायदा होईल, असे या संघटनांनी स्पष्ट केले.

कीडनाशके विक्रेत्यांना संगणकीय नोंदी ठेवण्यास मान्यता मिळण्यासाठी आम्ही चार वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. या प्रयत्नांना यश आल्याने आता हाच नियम बियाणे व खते विक्रीबाबत लागू करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे धरला जाईल.
- मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...