agriculture news in Marathi, There will be fourteen hundreds agricultural laborers in Latur division | Agrowon

लातूर विभागात होणार चौदाशे शेतीशाळा
हरी तुगावकर
गुरुवार, 25 एप्रिल 2019

लातूर ः या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीशाळा घेण्याचा उपक्रम कृषी विभागाच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. लातूर विभागात असलेल्या पाच जिल्ह्यांत चौदाशे कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळेतून प्रत्येक गावातील २५ शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस या पिकांत तज्ज्ञ बनविले जाणार आहे. या संदर्भात येथे विभागीय कार्यशाळा घेण्यात आली.

लातूर ः या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीशाळा घेण्याचा उपक्रम कृषी विभागाच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. लातूर विभागात असलेल्या पाच जिल्ह्यांत चौदाशे कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळेतून प्रत्येक गावातील २५ शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस या पिकांत तज्ज्ञ बनविले जाणार आहे. या संदर्भात येथे विभागीय कार्यशाळा घेण्यात आली.

शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना या उपक्रमांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. लातूर विभागात असलेल्या लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी या पाच जिल्ह्यांत एक हजार ४११ शेतीशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक टी. एन. जगताप, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी डी. जी. मूळे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे अरुण, प्रा. आरबवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे (लातूर), उमेश घाटगे (उस्मानाबाद), व्ही. डी. लोखंडे (हिंगोली), विजयकुमार पाटील (परभणी), आर. टी. सुखदेव (नांदेड) हे उपस्थित होते.

या वेळी श्री. जगताप यांनी शेतीशाळा संकल्पना व पाच जिल्ह्यांत शेतीशाळा अंमलबजावणी बाबत नियोजन करण्याच्या सूचना केल्या. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचे लागवड खर्च कमी करुन निव्वळ नफा वाढविण्याच्या दृष्टीने कार्यक्रम राबवावा, असे आवाहन केले.  श्री. मुळे यांनी शेतीशाळा संकल्पना सादरीकरणाद्वारे मांडली. अभ्यासक्रम व वेळापत्रक तसेच जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करून पाचही जिल्ह्यांतील सर्व कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक यांना प्रशिक्षित करून गावातील शेतकऱ्यांना पीकनिहाय शेतीशाळेतून प्रत्यक्ष बांधावर प्रक्षेत्रावर जाऊन तंत्रज्ञान पोचविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

सोयाबीन, तूर व कापूस पिकाचे लागवडीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञानाची माहिती श्री. गुट्टे यांनी दिली. प्रा. आरबवाड यांनी सोयाबीन, तूर, कापूस या पिकावर आढळणाऱ्या कीडी व रोगांची ओळख व नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय समन्वयक सूभाष चोले यांनी केले. तर कृषी अधिकारी एस. डी. राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्विततेसाठी सुनील देवकांबळे, कृषी पर्यवेक्षक विकास थोरात, कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे, ज्ञानेश्वर शिंदे, राजू जाधव, दिनेश कंदले यांनी पुढाकार घेतला.

लातूर विभागातील शेतीशाळांची संख्या पुढीलप्रमाणे
जिल्हा शेतीशाळांची संख्या
लातूर ३१५
उस्मानाबाद २९६
नांदेड ३८०
परभणी २५६
हिंगोली १६४
एकूण १४११

 

इतर बातम्या
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...