Agriculture News in Marathi There will be hybrid varieties Intensive planting | Agrowon

संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची सधन लागवड करून उत्पादकता वाढीचे प्रयत्न आजवर झाले. या पुढील काळात संकरीत वाणांच्या माध्यमातून देखील सधन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

 नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची सधन लागवड करून उत्पादकता वाढीचे प्रयत्न आजवर झाले. या पुढील काळात संकरीत वाणांच्या माध्यमातून देखील सधन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्यात १५ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक हलक्‍या प्रतीच्या जमिनीवर कापसाची लागवड होते, अशा भागात हे प्रयोग राबविण्याचे प्रस्तावीत असून, त्याद्वारे उत्पादकता वाढीचा उद्देश साधता येईल, असा विश्‍वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी गुरुवारी (ता. ७) व्यक्‍त केला. 

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था (सिरकॉट) सभागृहात कॉन्फडीरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीज, कॉटन डेव्हल्पमेंट ऍण्ड रिसर्च असोसिएशन मुंबई तसेच सिरकॉट यांच्या संयुक्‍त सहकार्याने जागतिक कापूस दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. प्रसाद म्हणाले, ‘‘बोंडअळीची समस्या गेल्या काही वर्षांत गंभीर होत चालली आहे. या समस्येचे प्रभावी निराकरण होण्यासाठी लवकरच सीआयसीआरद्वारे तंत्रज्ञानाची शिफारस केली जाणार आहे. त्या संदर्भातील संशोधन अंतिम टप्प्यात आहे. तंत्रज्ञान प्रसारावर देखील येत्या काळात भर दिला जाणार असून, त्याकरीता मोबाइलचा प्रभावी वापर करण्याची योजना आहे.

सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉन्फडीरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीजचे समन्वयक गोविंद वैराळे यांनी केले. रुईच्या प्रमाणात कापसाला दर मिळावा यासाठी संस्था गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा आणि जागृती करीत आहे. या मोहिमेला काही अंशी यश आल्याची माहिती त्यांनी दिली. कॉन्फडीरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीज या संस्थेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. 

सेंद्रीय कापूस करेल मालामाल 
जीमाटेक्‍स इंडस्ट्रीजचे संचालक प्रशांत मोहता म्हणाले, ‘‘या वर्षी कापसाचे दर सहा हजार रुपयांपेक्षा अधिक राहतील. सद्यःस्थितीत चीन सहित अनेक देशांची सेंद्रिय कापसाला मागणी आहे. सेंद्रीय कापूस गाठीचा दर ३०० रुपये किलो राहील.


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...