कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक होणार

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. खरीप हंगाम तोंडावर आलेला विक्रेते मात्र विविध समस्यांमुळे हैराण झालेले आहेत.
There will be a meeting on the problems of agricultural inputs sellers
There will be a meeting on the problems of agricultural inputs sellers

पुणे ः राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. खरीप हंगाम तोंडावर आलेला विक्रेते मात्र विविध समस्यांमुळे हैराण झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाईडस् सीडस् असोसिएशनच्या (माफदा) शिष्टमंडळासोबत कृषिमंत्र्यांनी दोन तास चर्चा केली.

‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव बिपिन कासलीवाल यांनी विविध मुद्दे मांडले. सोयाबीन बियाणे विक्रीतील अडचणी या शिष्टमंडळाने मांडल्या. तसेच, परराज्यातून येणारे कापूस बियाणे थांबवावे, निविष्ठा विक्रेते व कृषी सेवा केंद्र कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, लॉकडाउनमध्ये कृषी केंद्रांची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ करावी, प्रत्येक जिल्ह्यात खतांचा पुरवठा महिनावार आवंटनप्रमाणे करावा, अशाही मागण्या करण्यात आल्या.

माफदाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृषिमंत्र्यांनी श्री. तराळ यांचा सत्कार केला. तसेच, शेतकरी सन्मान निधी योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल देश पातळीवर कृषी विभागाचा सन्मान केला. त्यामुळे श्री. भुसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माफदाचे सचिव राजेंद्र भंडारी, दिनेश मुंदडा, राजू पाटील, उपाध्यक्ष केलास मालू, आबासाहेब भोकरे, अनिल निकम, बाळासाहेब सिरसाट यांनी भाग घेतला.

विक्रेत्यांना फक्त साक्षीदार करा यंदा कापूस बियाणे लवकर विक्री करण्याची परवानगी मिळावी. ‘पॉस’ मशीन ऐवजी ‘ऑफलाइन’ खत विक्रीला परवानगी द्या, निविष्ठांचे नमुने ‘अप्रमाणित’ निघाल्यास विक्रेत्यांना ‘आरोपी’ नव्हे तर फक्त ‘साक्षीदार’ करावे. राज्यात निविष्ठा नमुने काढले जात असून त्याची संख्या कमी करावी. यूरिया खत पोहोच मिळावे, खत कंपन्यांनी लिंकिंग न करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशा मागण्या कृषिमंत्र्यांकडे करण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com