Agriculture news in Marathi There will be a meeting on the problems of agricultural inputs sellers | Page 2 ||| Agrowon

कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक होणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. खरीप हंगाम तोंडावर आलेला विक्रेते मात्र विविध समस्यांमुळे हैराण झालेले आहेत.

पुणे ः राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. खरीप हंगाम तोंडावर आलेला विक्रेते मात्र विविध समस्यांमुळे हैराण झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाईडस् सीडस् असोसिएशनच्या (माफदा) शिष्टमंडळासोबत कृषिमंत्र्यांनी दोन तास चर्चा केली.

‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव बिपिन कासलीवाल यांनी विविध मुद्दे मांडले. सोयाबीन बियाणे विक्रीतील अडचणी या शिष्टमंडळाने मांडल्या. तसेच, परराज्यातून येणारे कापूस बियाणे थांबवावे, निविष्ठा विक्रेते व कृषी सेवा केंद्र कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, लॉकडाउनमध्ये कृषी केंद्रांची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ करावी, प्रत्येक जिल्ह्यात खतांचा पुरवठा महिनावार आवंटनप्रमाणे करावा, अशाही मागण्या करण्यात आल्या.

माफदाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृषिमंत्र्यांनी श्री. तराळ यांचा सत्कार केला. तसेच, शेतकरी सन्मान निधी योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल देश पातळीवर कृषी विभागाचा सन्मान केला. त्यामुळे श्री. भुसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माफदाचे सचिव राजेंद्र भंडारी, दिनेश मुंदडा, राजू पाटील, उपाध्यक्ष केलास मालू, आबासाहेब भोकरे, अनिल निकम, बाळासाहेब सिरसाट यांनी भाग घेतला.

विक्रेत्यांना फक्त साक्षीदार करा
यंदा कापूस बियाणे लवकर विक्री करण्याची परवानगी मिळावी. ‘पॉस’ मशीन ऐवजी ‘ऑफलाइन’ खत विक्रीला परवानगी द्या, निविष्ठांचे नमुने ‘अप्रमाणित’ निघाल्यास विक्रेत्यांना ‘आरोपी’ नव्हे तर फक्त ‘साक्षीदार’ करावे. राज्यात निविष्ठा नमुने काढले जात असून त्याची संख्या कमी करावी. यूरिया खत पोहोच मिळावे, खत कंपन्यांनी लिंकिंग न करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशा मागण्या कृषिमंत्र्यांकडे करण्यात आल्या.


इतर बातम्या
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...