agriculture news in marathi There will be no compromise on milk quality in the state Minister Kedar | Page 2 ||| Agrowon

राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड होणार नाही : मंत्री केदार 

वृत्तसेवा
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021

संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत तडजोड केली जाणार नाही. सॉर्टेड सिमेंट भेसळीबाबत प्रसंगी कडक कायदा करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे दुग्धविकास मंत्री आमदार सुनील केदार यांनी येथे केले आहे. 

संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत तडजोड केली जाणार नाही. सॉर्टेड सिमेंट भेसळीबाबत प्रसंगी कडक कायदा करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे दुग्धविकास मंत्री आमदार सुनील केदार यांनी येथे केले आहे. 

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या राजहंस भुकटी प्रकल्पाच्या उद्‍घाटन प्रसंगी कार्यक्रमात मंत्री श्री. केदार बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. तर व्यासपीठावर आमदार संग्राम थोपटे, आ. डॉ. सुधीर तांबे, महानंद व राजहंसचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर, महानंदचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पवार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत शिपूरकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे, सहाय्यक निबंधक दीपक परागे, दुग्ध विकास अधिकारी योगेश नागरे, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, डॉ. संजय मालपाणी आदी उपस्थित होते. याप्रसंगी अमृत उद्योग समूहाचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या चाळीस फूट उंच असलेल्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. 

मंत्री श्री. केदार म्हणाले, ‘‘संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो आहे. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी ऐंशीच्या दशकात राजदूत मोटरसायकलवर फिरून गावोगावी दूध संस्था सुरू केल्या. त्यातून आज तालुक्यात सुमारे सात लाख लिटर दूधनिर्मिती होत आहे. दूध भुकटी प्रकल्प हा सहकारी संस्थांना दिला आहे. संकटात शेतकऱ्यांना मदत करताना मिल्क पावडर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.’’ 

मंत्री श्री. थोरात म्हणाले, की दुग्ध विकासमंत्री व महानंद यांच्या पाठपुराव्यातून कोरोना संकटात दररोज दहा लाख लिटरची पावडर करण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. एक किलो पावडर बनवण्यासाठी २६० रुपये खर्च येतो. दूध पावडर पडून असताना असताना केंद्र सरकारने मात्र दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सहकारी संस्था अडचणीत आले आहेत. 

या वेळी दूध संघाचे संचालक सुभाष आहेर, विलासराव वरपे, बाबासाहेब गायकर, भास्कराव सिनारे, गंगाधर चव्हाण, विलास कवडे, पांडुरंग सागर, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहींज, माणिक यादव, राजेंद्र चकोर, सौ. प्रतिभाताई जोंधळे, सौ. ताराबाई धुळगंड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले. 

याप्रसंगी राजहंस कॉफी टेबल बुक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर वर्षात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या ३ शेतकऱ्यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्काराने, तर सर्वाधिक दूध उत्पादन करण्यास भाव देणाऱ्या ११ संस्थांचा गौरवही करण्यात आला. 

दुधाला किमान हमीभाव मिळावा : देशमुख 
दूध धंद्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी निर्माण होत आहे. मात्र सहकारी संस्थांसाठी सरकारचे अनेक निर्बंध असून, खासगीला मात्र कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे सहकारी संस्थांनी गुणवत्तेसाठी नाकारलेले दूध खाजगीवाले कोणत्याही भावात स्वीकारतात. उत्पादकांना देणारा भाव व वाहतूक खर्च यांचा त्यांच्याकडे ताळमेळ नसतो म्हणून सहकारी संस्थांसाठी असलेला रेव्हेन्यू शेअरिंग फार्म्यूला हा खाजगीसह सर्वत्र राबविण्यात यावा जेणेकरून सर्वांमध्ये समानता दिसेल. तसेच उसाप्रमाणे दुधाला ही किमान हमीभाव राज्य सरकारने द्यावा अशी आग्रही मागणी राजहंस दूध संघाचे चेअरमन व महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...