पावसाची उघडीप राहणार

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी राज्यात पाऊस उघडीप दिली असून, आज (ता. २०) मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
There will be no rain
There will be no rain

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी राज्यात पाऊस उघडीप दिली असून, आज (ता. २०) मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा परिसरावर तयार झालेले कमी दाब क्षेत्र बिहारकडे सरकले आहे. तर उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या दोन्ही प्रणालींच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

पश्‍चिमी चक्रावात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वारे एकत्र आल्याने उत्तर भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे आणि कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

गेले दोन-तीन दिवस विदर्भ, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. राज्यात पावसाने उघडीप दिली असून, कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. आज राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६ (१९), नगर ३२.३ (-), जळगाव ३२.४ (१९.७), कोल्हापूर ३१.३ (२०.८), महाबळेश्‍वर २५.८ (१५.४), मालेगाव ३२.८ (२२.०), नाशिक ३०.१ (१८.३), सांगली ३२.३ (२१.१), सातारा ३०.५ (१८.७), सोलापूर ३३.७ (२०.६), सांताक्रूझ ३२.७ (२४.०), अलिबाग ३२.७ (-), डहाणू ३२.२ (२३.८), रत्नागिरी ३२.६ (२३), औरंगाबाद ३१.४ (१९.१), बीड ३०.५ (-), नांदेड ३१.६ (२१.२), उस्मानाबाद - (२०.६), परभणी ३१.७ (२१.२), अकोला ३०.९ (२१.४), अमरावती २८ (१९.७), ब्रह्मपुरी ३२.४ (२१.७), बुलडाणा २८.२ (१९.८), चंद्रपूर ३१.८ (२४.६), गडचिरोली ३२.४ (२७.८), गोंदिया ३२ (२३.४), नागपूर ३१.३ (२२.२), वर्धा २९.५ (२३), वाशीम २८.०(१९), यवतमाळ (२१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com