Agriculture news in Marathi There will be no rain | Page 2 ||| Agrowon

पावसाची उघडीप राहणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी राज्यात पाऊस उघडीप दिली असून, आज (ता. २०) मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी राज्यात पाऊस उघडीप दिली असून, आज (ता. २०) मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा परिसरावर तयार झालेले कमी दाब क्षेत्र बिहारकडे सरकले आहे. तर उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या दोन्ही प्रणालींच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

पश्‍चिमी चक्रावात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वारे एकत्र आल्याने उत्तर भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे आणि कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

गेले दोन-तीन दिवस विदर्भ, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. राज्यात पावसाने उघडीप दिली असून, कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. आज राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.६ (१९), नगर ३२.३ (-), जळगाव ३२.४ (१९.७), कोल्हापूर ३१.३ (२०.८), महाबळेश्‍वर २५.८ (१५.४), मालेगाव ३२.८ (२२.०), नाशिक ३०.१ (१८.३), सांगली ३२.३ (२१.१), सातारा ३०.५ (१८.७), सोलापूर ३३.७ (२०.६), सांताक्रूझ ३२.७ (२४.०), अलिबाग ३२.७ (-), डहाणू ३२.२ (२३.८), रत्नागिरी ३२.६ (२३), औरंगाबाद ३१.४ (१९.१), बीड ३०.५ (-), नांदेड ३१.६ (२१.२), उस्मानाबाद - (२०.६), परभणी ३१.७ (२१.२), अकोला ३०.९ (२१.४), अमरावती २८ (१९.७), ब्रह्मपुरी ३२.४ (२१.७), बुलडाणा २८.२ (१९.८), चंद्रपूर ३१.८ (२४.६), गडचिरोली ३२.४ (२७.८), गोंदिया ३२ (२३.४), नागपूर ३१.३ (२२.२), वर्धा २९.५ (२३), वाशीम २८.०(१९), यवतमाळ (२१).


इतर अॅग्रो विशेष
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...