Agriculture news in Marathi There will be a thousand new nurseries | Agrowon

एक हजार नव्या रोपवाटिका होणार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

राज्यात नव्याने एक हजार रोपवाटिका उभारण्यासाठी अनुदानापोटी ४६ कोटी रुपये वाटण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

पुणे ः राज्यात नव्याने एक हजार रोपवाटिका उभारण्यासाठी अनुदानापोटी ४६ कोटी रुपये वाटण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्यात १० गुंठे क्षेत्राच्या ५०० रोपवाटिकांना अनुदान देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र गेल्या वर्षी २५७ रोपवाटिका उभारल्या गेल्या. तर १३९ उभारणीच्या प्रक्रियेत आहेत. 

आतापर्यंत अनुदानवाटप तीन कोटी ४३ लाखांपर्यंत झालेले आहे. आरकेव्हीवायच्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने चालू वर्षात आणखी एक हजार रोपवाटिका उभारण्यास मान्यता दिली आहे. रोपवाटिका उभारणीसाठी चार लाख ६० हजार रुपये खर्च येतो. त्यावर दोन लाख ३० हजार रुपये अनुदान मिळते. यात रोपवाटिका उभारणीनंतर एक लाख ३८ हजार रुपये आणि प्रत्यक्ष रोपे तयार होताच, आणखी ९२ हजार रुपयांचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे. 

निधी भरपूर असतानाही पहिल्या वर्षी लक्ष्यांकाइतक्या रोपवाटिका उभ्या राहू शकल्या नाहीत. ‘‘रोपवाटिकेसाठी शेडनेट व हरितगृहाची आवश्यकता असते. त्यासाठी मुळात एकात्मिक फलोत्पादन अभियान, आरकेव्हीवायमधूनदेखील अनुदान मिळते. तसेच, कोविड १९ साथीमुळे प्रत्येक तालुक्यात प्रतिसाद मिळाला नाही. तथापि, चालू वर्षात या योजनेचा विस्तार होण्यास वाव आहे,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  

रोपवाटिका अनुदान मिळण्यासाठी पूर्वी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात होते. मात्र, आता महाडीबीटी पोर्टलवर ही योजना आणली गेली आहे. त्यामुळे https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरून थेट अर्ज करता येतो, असे फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या वाटा शोधणाऱ्या युवक-युवतींसाठी रोपवाटिकांची उभारणी हे चांगले ध्येय ठरू शकते. महिला कृषी पदवीधारकांना या योजनेत प्राधान्य दिले जात आहे. याशिवाय महिला गट, महिला शेतकरी, भाजीपाला उत्पादक, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि शेतकरी गटांना थेट ‘महाडीबीटी’ पोर्टलमधून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- डॉ. कैलास मोते, फलोत्पादन संचालक, कृषी आयुक्तालय

असे मिळणार रोपवाटिकेला अनुदान (रुपयांत)
घटक क्षेत्र किंवा नग संख्या खर्चाचा 
मापदंड
प्रकल्प खर्च मिळणारे अनुदान
३.२५ मीटर उंचीचे फ्लॅटटाइप शेडनेटगृह १००० चौ.मी. ३८० प्रति चौ.मी. ३,८०,००० १,९०,००० 
प्लॅस्टिक टनेल १०००
चौ.मी.
१० प्रति 
चौ.मी.
६०,००० ३०,००० 
पॉवर नॅपसॅक स्प्रेअर १ नग ७,६०० 
 
७,६०० ३,८०० 
प्लॅस्टिक क्रेट्‌स ६२ नग २०० १२,४०० ६,२००

 


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...