Agriculture news in marathi They left us, they lost: Sharad Pawar | Agrowon

आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले : शरद पवार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

१९८०ला ५६ आमदारांचा विरोधीपक्ष नेता म्हणून काम करत होतो. ५० आमदार फुटले, ६ आमदार शिल्लक राहिले. त्यानंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेल्या ५० पैकी ४८ आमदार पराभूत झाले, असे शरद पवार म्हणाले.

नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा विरोधीपक्ष नेता म्हणून काम करत होतो. कामासाठी इंग्लडला गेलो असताना ५० आमदार फुटले, ६ आमदार शिल्लक राहिले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सोडून गेलेल्या ५० पैकी ४८ आमदार पराभूत झाले. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीतही सोडून गेलेले पराभूत झाले.

लोकांच्या मनात काय चाललेय हे मला आधीच समजले होते, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर नाव न घेता टीका केली. अगस्ती साखर कारखान्याच्या अडचणींवर मात करू, मात्र झारीतील शुक्राचार्य कोण ओळखा अन्‌ त्यांना बाजूला करा, असे आवाहनही पवार यांनी अकोलेकरांना केले. 

अकोले (जि. नगर) तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथे शरद पवार यांच्या हस्ते माजी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, राजेंद्र फाळके, संदीप वरपे, आमदार माणिक कोकाटे, डॉ . किरण लहामटे, माजी आमदार गोटीराम पवार, दशरथ सावंत, मधुकर नवले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘अगस्ती साखर कारखान्यावर ३०० कोटी कर्ज असल्याचे सांगण्यात आले. मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूचा अध्यक्ष आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अल्कोहोल निर्मिती, वीज निर्मिती, सीएनजी निमिर्तीतून समस्या दूर करू, परंतु झारीतील शुक्राचार्य कोण हे ओळखून त्यांना बाजूला करा. तालुक्याच्या रस्ते, पर्यटन विकासाबाबत तुम्हाला पालकमंत्री यांनी माझ्या समक्ष आश्वासन दिले त्यामुळे ते पूर्ण करू.’’ 
 


इतर ताज्या घडामोडी
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी योजनामहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डद्वारे...
कृषी सल्ला (परभणी विभाग)पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला...
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
वनशेतीमध्ये चारा पिकांची लागवड फायदेशीर...वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान...
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...