Agriculture news in Marathi Thieves raid onions and other materials at Nampur | Agrowon

नामपूर येथे कांद्यासह इतर साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कांद्याचे भाव दिवसागणिक वाढत असताना कांदा चोरीच्या घटनांनी कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अशीच घटना नामपूर येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत सावंत यांच्या बाबतीत घडली. शेताचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी उन्हाळ कांदा, ठिबकच्या नळ्या, पिस्टन नळ्या असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे भाव दिवसागणिक वाढत असताना कांदा चोरीच्या घटनांनी कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अशीच घटना नामपूर येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत सावंत यांच्या बाबतीत घडली. शेताचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी उन्हाळ कांदा, ठिबकच्या नळ्या, पिस्टन नळ्या असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

येथील कांदा उत्पादक शेतकरी शशिकांत सावंत यांची साक्री रस्त्यालगत (गट क्र.१०३) मध्ये सुमारे पाच एकर शेती आहे. मार्च महिन्यात त्यांनी उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले. भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने आपल्या कांदाचाळीत साठवून ठेवला. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दराने दोन हजार रुपयांचा टप्पा पार केल्याने श्री. सावंत समाधानी होते. त्यानंतर त्यांनी दोन ट्रॉली कांदा विकला. परंतु शुक्रवार (ता. ११) सकाळी शेतात गेल्यानंतर कांदा व ठिबकसिंचन संच चोरीस गेल्याचे उघडकीस आले.

आपल्या शेतातील सुमारे दहा क्विंटल कांदे, पाच एकर क्षेत्रावरील ठिबक सिंचनाच्या नळी, ९०० फूट पिस्टनची नळी असा ऐवज चोरून नेला. कांदा चाळीमध्ये कांदा नसल्याने त्यांना जबर धक्काच बसला. परिसरात पाहणी केली असता शेतापासून काही अंतरावरच थोडे फार कांदे पडले होते. त्याठिकाणी गाडीच्या चाकाच्या खुणा दिसून आल्या. चोरट्यांनी गाडीत कांदा चोरून नेल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

विक्री आधीच चोरट्यांनी शेतातील कांद्यावर डल्ला मारल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.चोऱ्यांमागे स्थानिक चोरट्यांचाच हात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...