नाशिकमध्ये चोरट्यांचा कांद्यावर डल्ला

नाशिकमध्ये चोरट्यांचा कांद्यावर डल्ला
नाशिकमध्ये चोरट्यांचा कांद्यावर डल्ला

नाशिक : चालू हंगामात कांद्याला गेल्या दोन आठवड्यांपासून चांगले दर मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील कळवण व मालेगाव तालुक्यांत कांदाचोरीची प्रकरणे समोर येत आहेत. सध्या कांद्याचे भाव तेजीत असताना चोरट्यांचा कांद्यावर डल्ला मारण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे साठवलेला कांदा सांभाळून ठेवताना कांदा उत्पादकांना लक्ष द्यावे लागणार आहे. 

याबाबत माहिती अशी, कळवण तालुक्यातील मोकभनगी येथील शेतकरी राहुल बाजीराव पगार यांच्या शेतातील कांद्यावर रविवारी (ता. २२) रात्री चोरट्यांनी कांदा चोरला. पगार यांनी मोकभनगी शिवारात २२ किलो वजनाच्या ११७ क्रेटमध्ये कांदा निवडून ठेवलेला होता. त्यामुळे १ लाख १ हजार ७९० रुपयांची त्यांची चोरी झाली. पाण्याची अडचण असताना दुष्काळावर मात करत उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने त्यांनी २५ क्विंटल ७४ किलो कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला. मात्र, या शेतकऱ्यांच्या कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. याबाबत त्यांनी कळवण पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यात कौळाने येथील कांदा उत्पादक शेतकरी शांताराम देसाई यांच्या कांदा चाळीतून ९० किलो कांदा चोरीला गेला. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे दोन हजार सातशे रुपयांचा कांदा चोरीला गेला आहे. मात्र, कांदा विक्री करताना संशयित आढळून आल्याचे समजते. संबंधितांवर मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. या कांदाचोरीच्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com