agriculture news in marathi, third phase of mahajanadesh yatra starts from nagar, maharashtra | Agrowon

महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास होणार नगरमधून प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नगर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा नगर जिल्ह्यातून सुरू होणार आहे. ही यात्रा शुक्रवारी (ता. १३) व शनिवारी (ता. १४) नगर जिल्ह्यात येणार आहे. त्यात शुक्रवारी अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्याच दिवशी सायंकाळी नगरमध्ये ‘रोड शो’ होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी सांगितले. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात सात जिल्ह्यांचा समावेश आहे. 

नगर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा नगर जिल्ह्यातून सुरू होणार आहे. ही यात्रा शुक्रवारी (ता. १३) व शनिवारी (ता. १४) नगर जिल्ह्यात येणार आहे. त्यात शुक्रवारी अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्याच दिवशी सायंकाळी नगरमध्ये ‘रोड शो’ होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी सांगितले. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात सात जिल्ह्यांचा समावेश आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात महाजनादेश यात्रा काढून लोकांशी संवाद साधत आहेत. मागील आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेतील अकोले, संगमनेर, राहुरी येथील जाहीर सभा व नगरमधील ‘रोड शो’ रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. शुक्रवारी सकाळी अकोले, दुपारी साडेबाराला संगमनेर येथे आणि दुपारी तीनला राहुरी येथे सभा होणार आहे.

सायंकाळी नगर येथील ‘रोड शो’नंतर मुख्यमंत्री नगरमध्ये मुक्काम करणार आहेत. शनिवारी (ता. १४) सकाळी मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर काष्टीमार्गे (ता. श्रीगोंदा) यात्रा दौंडला जाणार असून, तेथे सभा होणार आहे. बारामती, उरुळीकांचन येथून हडपसर, पुणे येथे महाजनादेश यात्रा जाईल. पुण्यातील मुक्कामानंतर रविवारी (ता. १५) भोर, वाईवरून सातारा येथे यात्रा पोहोचेल. त्यानंतर सातारा येथे सभा होईल. कराडला सभा व मुक्काम असेल.

सोमवारी (ता. १६) कराड येथे पत्रकारांशी संवाद साधून पळूसला सभा होईल. तासगाव, मिरज, सांगलीवरून यात्रा शिरोळ येथे पोहोचेल. शिरोळ येथे सभा होईल. त्यानंतर इचलकरंजी, हातकणंगलेवरून कोल्हापूरला येथे यात्रा पोहोचेल. कोल्हापूरला मुख्यमंत्र्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर मंगळवारी (ता. १७) कोल्हापूरला पत्रकारांशी संवाद साधून कणकवलीत व रत्नागिरीत सभा होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...