Agriculture News in Marathi From thirteen sugar factories 19 lakh tonnes of sugarcane crushed | Agrowon

तेरा साखर कारखान्यांकडून  १९ लाख टन उसाचे गाळप 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 डिसेंबर 2021

सांगली जिल्ह्यातील १८ पैकी पाच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या वर्षी बंद राहिले आहेत. यामुळे सध्या तेरा कारखान्यांचे हंगाम सुरू असून, २० लाख ६६ हजार ६९२ टन उसाचे गाळप करून १९ लाख ९५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सांगली ः जिल्ह्यातील १८ पैकी पाच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या वर्षी बंद राहिले आहेत. यामुळे सध्या तेरा कारखान्यांचे हंगाम सुरू असून, २० लाख ६६ हजार ६९२ टन उसाचे गाळप करून १९ लाख ९५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सर्व कारखान्यांचा साखर उतारा सरासरी १०.४० टक्के आहे. 

जिल्ह्यात सहकारी आणि खासगी, असे अठरा साखर कारखाने आहेत. व्यवस्थापनाच्या चुकीच्या कारभारामुळे महांकाली, माणगंगा या सहकारी साखर कारखान्यांसह केन ॲग्रो, यशवंत, तासगाव हे तीन खासगी साखर कारखान्यांचेही हंगाम सध्या बंद आहेत. उर्वरित तेरा कारखान्यांचे हंगाम जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऊसतोडणी या पावसाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे गाळप हंगाम थोडासा मंदावला असल्याचे चित्र आहे. सध्या अजून देखील शेतात पाणी असल्याने ऊस तोडणी थांबली असून, येत्या चार ते पाच दिवसांत पुन्हा जोमाने ऊसतोडणी सुरू होईल. 

या हंगामासाठी १ लाख २१ हजार ३८० हेक्टर उसाची कारखान्यांकडे नोंदणी आहे. एप्रिलपर्यंत हंगाम चालू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याने सर्वाधिक २ लाख ४७ हजार टन उसाचे गाळप करून २ लाख ८६ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या कारखान्याचा साखर उतारा ११.६० टक्के इतका आहे. तर जत तालुक्यातील राजारामबापू पाटील या युनिटने सर्वांत कमी उसाचे गाळप केले आहे. राजारामबापू पाटील जत युनिटने ८२ हजार टन उसाचे गाळप केले असून, ७४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 


इतर बातम्या
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...