सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर जनावरे

तेरा छावण्यांत पाच हजारांवर जनावरे
तेरा छावण्यांत पाच हजारांवर जनावरे

सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत २२ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी १३ चारा छावण्या सुरू झालेल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये मोठी ४ हजार ४६५ लहान अशी एकूण ५ हजार ३०६ जनावरे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

डॉ. चौधरी म्हणाले, ''जिल्ह्यात २२ मंजूर चारा छावण्यांपैकी आटपाडी तालुक्यात तडवळे, आवळाई, शेटफळे, उंबरगाव, पळसखेल, लिंगीवरे, झरे व बोंबेवाडी येथे कवठेमहांकाळ तालुक्यात चुडेखिंडी येथे, तर जत तालुक्यात लोहगाव, दरिबडची, सालेकिरी व बेवनूर येथे चारा छावण्या सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर जत तालुक्यात बालगाव, कुडणूर, आवंढी, अचकनहळ्ळी, वायफळ, कोसारी व बनाळी येथे, आटपाडी तालुक्यात करगणी येथे व कवठेमहांकाळ तालुक्यात अलकूड एस येथे चारा छावणी सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.''

राज्य शासनाकडून चारा छावण्यातील जनावरांच्या अनुदानातही प्रतिजनावर १० रुपये वाढ करण्यात आली आहे. मोठ्या जनावरासाठी प्रती जनावर आता १०० रुपये आणि लहान जनावरासाठी ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यकतेनुसार चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णयानुसार चारा छावण्या सुरू करावयाच्या आहेत. विशेषतः जत पूर्व भाग, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत चारा छावण्यांची मागणी होत आहे.

जत तालुक्यात संख, उमदी, माडग्याळ, खोजनवाडी, गुड्डापूर, बोर्गी, जाडरबोबलाद, आसंगी तुर्क, कोंत्येव बोबलाद, बसर्गी, जिरग्याळ, बिळूर, सनमडी, खलाटी, करेवाडी आणि एकोंडी या ठिकाणी चारा छावणी सुरू केली जाणार आहे.

चारा छावणीनिहाय जनावरे    

छावणी मोठी जनावरे   लहान जनावरे
तडवळे ८३० १४२
आवळाई ६७४  १५१
चुडेखिंडी ७८७ ११५
शेटफळे २८७ ६०
लोहगाव ६१७ ११७
दरिबडची ३७६  ७३
सालेकिरी  २८५ ४२
बेवनूर ३९३ ६१
उंबरगाव  ७१   २८
पळसखेल १४५ ५२
एकूण ४ हजार ४६५ ८४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com