पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : तीस जण निवडणूक रिंगणात

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ३१) झाली. यामध्ये ३८ उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : तीस जण निवडणूक रिंगणात
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : तीस जण निवडणूक रिंगणात

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ३१) झाली. यामध्ये ३८ उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३८ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. उमेदवारी अर्जांची छाननीत शितल शिवाजी आसबे, सिद्धाराम सोमाण्णा काकणकी यांचे वय कमी असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला. बळिराम जालिंदर बनसोडे, किशोर सीताराम जाधव, सुधाकर रामदास बंदपट्टे यांनी अनामत रक्कम कमी भरल्याने व गणेश शिवाजी लोखंडे यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे अर्ज अवैध ठरविण्यात आला. मतदारसंघाबाहेरील सूचक असल्याने सतिश विठ्ठल जगताप यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तसेच पोपट हरी धुमाळ या उमेदवाराचा अर्ज मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने व एकच सूचक दिल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी भगीरथ भालके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), समाधान आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम भोसले (बळिराजा पार्टी), सिद्धेश्‍वर आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप खरात, नागेश पवार, नागेश भोसले, इलियास शेख, रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, संजय पाटील, अशोक वाघमोडे, अभिजित आवाडे-बिचकुले, अमोल माने, सुनील गोरे, सीताराम सोनवले, सिद्धेश्‍वर आवताडे, मोहन हळणवर, रामचंद्र सलगर, सुदर्शन खंदारे, कपिलदेव कोळी, सुदर्शन मसुरे, मनोज पुजारी, बापू मेटकरी, बिरुदेव पापरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी या वेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भारत भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान महादेव आवताडे हे दोन्हीही अनुक्रमे विठ्ठल आणि दामाजी या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी एफआरपीची ऊसबिले थकवली आहेत. सरकारने या कारखान्यावर आरआरसी कारवाई केली आहे, हे दोन्हीही उमेदवार थकबाकीदार असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करावेत, अशी मागणी अपक्ष उमेदवार मोहन हळणवर यांनी केली. पण ती फेटाळण्यात आली.   शनिवारी चित्र स्पष्ट होणार निवडणूक रिंगणात ३० उमेदवार असले, तरी येत्या शनिवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com