नगर जिल्‍ह्यात ३४ लाख ६८ हजार मतदार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः विधानसभेसाठी नगर जिल्ह्यामधील बारा मतदारसंघात ३४ लाख ६८ हजार ५२२ इतके मतदार आहेत. त्यात १६ लाख ६२ हजार ८३४ महिला व १८ लाख ५ हजार ५२६ पुरुष मतदार आहेत. सर्वाधिक ३ लाख ४० हजार ३९० मतदार हे शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. 

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात एकाच दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आयोगाकडून ३१ जानेवारी २०१९ रोजीच्या अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी करण्यात आली. त्यानुसार १२ विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार हे ३४ लाख ६८ हजार ५२२ इतके आहेत. 

जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ असून अकोले हा अनुसूचित जमातीसाठी तर श्रीरामपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. उर्वरित संगमनेर, शिर्डी (राहता), कोपरगाव, नेवासा, शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड हे मतदारसंघ खुले आहेत. सर्वाधिक ३ लाख ४० हजार ३९० मतदार हे शेवगाव- पाथर्डी मतदार संघात तर अकोले मतदार संघात सर्वात कमी २ लाख ५३ हजार ९६९ मतदार आहेत.

शुक्रवारपासून (ता. २७) उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात झाली आहे. नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी ॲप तसेच १९५० हा टोलफ्री क्रमांक उपलब्ध आहे. निवडणुकीसाठी ३ हजार ७२२ मतदान केंद्रे आहेत. मतदानासाठी सात हजार बॅलेट युनिट, ५२३० सीयू आणि ५४५० व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com