सिंधुदुर्गातील आणखी १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

सिंधुदुर्ग ः जिल्हा रूग्णालयामार्फत ‘कोरोना’ तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांपैकी आणखी १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या जिल्ह्यात ५५ व्यक्ती आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकही रुग्ण ‘कोरोना’बाधित नसला तरी खबरदारीचे सर्व उपाय केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
thirty more person corona test reported negative in Sindhudurg

आरोग्य यंत्रणेमार्फत आत्तापर्यंत १४४ संशयितांचे नमुने ‘कोरोना’ तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. त्यातील १०४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील १०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचाराअंती त्या व्यक्तींचा अहवाल देखील निगेटिव्ह आला होता. पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी अजूनही ४० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

जिल्ह्यात आजमितीस ४३५ जण विलगीकरणात असून ३९० व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. ४५ व्यक्तींना संस्थांत्मक  विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. २८ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील १८५ व्यक्तींना होम क्वारंटाइनमुक्त करण्यात आले आहे. जिल्हा रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात सध्या ५५ जण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात सध्या एकही ‘कोरोना’ बाधीत रूग्ण नसला तरी खबरदारी म्हणून सर्व उपाय केले जात आहेत. ३ मे पर्यंत संचारबंदी असणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. आरोग्य विभागामार्फत ताप, खोकल्यांच्या रूग्णांचे सक्रिय सर्व्हेक्षण सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com