Agriculture news in Marathi, Thirty percent less compensation than Panchanama | Page 2 ||| Agrowon

पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा कमी भरपाई

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नागली पिकांचे ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. शासनाकडून हेक्टरी ८ हजार रुपये मदत जाहीर झाली असून, गुंठ्याला ८० रुपयेच मिळतील. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे कसण्यासाठीचे क्षेत्र कमी आणि सातबावरील सहहिस्सेदार अधिक असल्यामुळे ही मदत अपुरी ठरणार आहे.

रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नागली पिकांचे ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. शासनाकडून हेक्टरी ८ हजार रुपये मदत जाहीर झाली असून, गुंठ्याला ८० रुपयेच मिळतील. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे कसण्यासाठीचे क्षेत्र कमी आणि सातबावरील सहहिस्सेदार अधिक असल्यामुळे ही मदत अपुरी ठरणार आहे.

अतिवृष्टीमुळे कोकणातील गरवे, निमगरवे भातबियाण्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षणात ५३ हजार ९३७ शेतकऱ्यांचे ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले. पंचनाम्यात नुकसानीची रक्कम सुमारे २६ कोटी ७५ लाखांच्या घरात जाते. त्यापोटीची मदत जाहीर झाली असून, राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपये ठेवले आहेत. त्यानुसार जिल्ह्याला ९ कोटी ३६ लाख ४८ हजार रुपये मिळतील. ही रक्कम पंचनाम्यातील नुकसानीच्या तुलनेत अवघी तीस टक्केच आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हेक्टरी भातशेती करणारे शेतकरी अत्यल्प आहेत. एकरी किंवा काही गुंठ्यात क्षेत्र असते. जुन्या निकषानुसार हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत मिळत होती. त्यात बाराशे रुपयांची भर पडली असून, ती हेक्टरी आठ हजार रुपये केली आहे. 

महाराष्ट्रात नवीन सरकार येईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान तिप्पट मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती; मात्र राष्ट्रपती राजवटीमुळे ती फोल ठरली आहे.कोकणात सातबारावरील सहहिस्सेदारांच्या नावांची संख्या अधिक असल्यामुळे मदत वाटपात नेहमीच अडचणी निर्माण होतात. भातशेती नुकसानीतही त्याचा प्रत्यय येईल. गुंठ्याला ८० रुपये म्हणजे ज्यांची वीस गुंठे जमीन असेल त्यांना १६०० रुपये मिळतील. सहहिस्सेदारांमध्ये वाटप करताना प्रत्येकाच्या वाट्याला कवडीमोल भरपाई मिळेल.


इतर ताज्या घडामोडी
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...