थोरात, विखे कारखान्याची निवडणूक बिनविरोध 

Thorat, Vikhe factory election unopposed
Thorat, Vikhe factory election unopposed

नगर ः संगमनेरमधील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व प्रवरानगर (ता. राहाता) येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यावरील आपापली सत्ता कायम ठेवली. अर्जमाघारी घेण्याच्या तारखेनंतर हे स्पष्ट झाले.

संगमनेरमधील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २०२० ते २५ साठी निवडणुकीच्या अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी शेतकरी विकास मंडळाच्या सर्व विरोधकांनी माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे यांनी घोषित केले. कारखान्याच्या २२ हजार ५०० सभासदांमधून संचालकपदाच्या २१ जागांसाठी ३८२ जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, नव्या-जुन्यांचा मेळ घालत शेतकरी विकास मंडळाने दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी माघार घेत, सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवली. 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही बिनविरोध करत माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ता कायम ठेवली. विशेष म्हणजे सुरुवातीलाच बिनविरोध निवडणूक करण्याच्या उद्देशाने जागेनुसार एकएकच अर्ज दाखल केला होता. एकवीस संचालकांच्या या मंडळात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश असून, त्यात दहा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 

थोरात कारखान्याचे संचालक मंडळ  सोसायटी मतदारसंघ- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, इंद्रजित थोरात, इंद्रजित खेमनर, मीनानाथ वर्पे, बाबा ओहोळ, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, संपतराव गोडगे पाटील, दादासाहेब कुटे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, विनोद हासे, अनिल काळे, चंद्रकांत कडलग, संतोष हासे, भास्कर आरोटे. भटक्‍या-विमुक्त जाती-जमाती- गणपतराव सांगळे, अनुसूचित जाती-जमाती- माणिक यादव, इतर मागासवर्गीय- अभिजित ढोले. महिला राखीव- मीरा वर्पे, मंदा  वाघ. 

विखे कारखान्याचे संचालक मंडळ  कैलास तांबे (चिंचपूर), डॉ. दिनकर गायकवाड (आश्‍वी खुर्द), ॲड. भानुदास तांबे (दाढ बुद्रुक), देवीचंद तांबे (दाढ बुद्रुक), विश्‍वास कडू (सात्रळ), उत्तम दिघे (धानोरे), आमदार राधाकृष्ण विखे पाटील (लोणी बुद्रुक), दादासाहेब घोगरे (लोणी खुर्द), संजय आहेर (लोणी खुर्द), धनंजय दळे (भगवतीपूर), स्वप्निल निबे (कोल्हार बुद्रुक), दत्तात्रय खर्डे (कोल्हार बुद्रुक), साहेबराव  म्हस्के (बाभळेश्‍वर), सतिश ससाणे (ममदापूर), संपत चितळकर (मांडवे), उज्ज्वला घोलप (हणमंतगाव), संगिता खर्डे (भगवतीपूर), शांताराम जोरी (दाढ खुर्द), बाबू पलघडमल (सात्रळ), सुभाष अंत्रे (सोनगाव), रामभाऊ भुसाळ (उंबरी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com