Agriculture news in marathi Those girls got the opportunity to become the Collector, Superintendent of Police | Agrowon

मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बनण्याची संधी

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 मार्च 2020

बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त असंख्य कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. बुलडाणा जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत समाजातील मुलींमध्ये सकारात्मक प्रेरणा पोचविण्यासाठी त्यांना थेट जिल्हा प्रमुखांच्या खुर्चीवर बसून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी मिळवून दिली. कुणी जिल्हाधिकारी, कुणी जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी तर कुणी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कामकाजाचा अनुभव घेतला. महिला दिनाच्या अनुषंगाने हा सप्ताह राबविण्यात आला. 

बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त असंख्य कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. बुलडाणा जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत समाजातील मुलींमध्ये सकारात्मक प्रेरणा पोचविण्यासाठी त्यांना थेट जिल्हा प्रमुखांच्या खुर्चीवर बसून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी मिळवून दिली. कुणी जिल्हाधिकारी, कुणी जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी तर कुणी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कामकाजाचा अनुभव घेतला. महिला दिनाच्या अनुषंगाने हा सप्ताह राबविण्यात आला. 

दररोज विविध तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींना जिल्हा मुख्यालय स्तरावरील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या वरिष्ठ पदावर सांकेतिक स्वरूपात कारभार पाहण्याची संधी देण्यात आली. सांकेतिक स्वरूपात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी अशा प्रशासकीय पदाचा पदभार देण्यात आला होता.

यासाठी समाजातील अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलींची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली होती. जिल्हाधिकारी बनलेल्या पूनम देशमुख हिने संपूर्ण दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे विविध बैठकांना उपस्थिती लावली. जिल्हाधिकाऱ्यांना मिळणारा मान, सन्मान तिच्या वाट्याला आला. यामुळे ती भारावून गेली होती.

गॅरेज मेकॅनिक अब्दुल आसिफ यांची मुलगी असलेल्या सहरिश कंवल हिला पोलिस अधीक्षक पदाची संधी मिळाली. पोलिस अधीक्षकांच्या अंबर दिव्याच्या गाडीत सहरिश कंवलचे जिल्हा पोलिस मुख्यालयात आगमन झाले. या वेळी पोलिस दलाच्या प्रचलित शिष्टाचारानुसार, पोलिस दलाच्या सशस्त्र तुकडीने सहरिश कंवलला मानवंदना दिली. वेगवेगळ्या दिवशी अशा प्रकारची प्रशासकीय कामकाजाची संधी समाजातील मुलींना मिळाली.

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मारीया मोहम्मद आबीदला जिल्हाधिकारी बनण्याची संधी मिळाली. तर एक दिवसासाठी राखी अनिल दुरगुळे ही जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी बनली. तिला दिवसभर खुर्चीसोबतच या पदाच्या कामकाजाचा सन्मानपूर्वक अनुभव देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कुठलीही कसर ठेवली नाही. 

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून त्यांच्या कामकाजाचा अनुभव घेणे, हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. मला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेमुळे थेट जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला. मी दिवसभर प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेतला. मलाही भविष्यात कलेक्टरच व्हायचे आहे. त्यासाठी अभ्यास करून कठोर परिश्रम घेण्याची माझी तयारी आहे. माझ्या मोठ्या बहिणीची जिल्हाधिकारी व्हायची इच्छा होती. मात्र, कौटुंबिक परिस्थितीमुळे तिचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मी ते पूर्ण करणार आहे.
 - पूनम प्रल्हाद देशमुख, इयत्ता ८ वी, जिल्हा परिषद शाळा, 
पाडळी, जि. बुलडाणा

मी एक दिवसाची पोलिस अधीक्षक बनली होती. या कामाचा अनुभव खूप मोठा आहे. मी माझ्या आयुष्यात महिला व बालकांवरील अत्याचाराला पायबंद घालून प्रत्येक मुलीला ‘होईल मी स्वयंसिद्धा़’ या ध्येयापर्यंत पोचविण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करेल.
- सहरिश कंवल, इयत्ता ९ वी,  जिल्हा परिषद उर्दू शाळा मलकापूर जि. बुलडाणा


इतर महिला
पूरक उद्योगातून मिळाली आर्थिक साथपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
गटामुळे मिळाली शेती, पूरक उद्योगाला...  टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील...
अजीर्ण, अपचनावर गुणकारी बडीशेपकोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या...
नाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धीकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात...
गुणकारी कोकमकोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते....
महौषधी जिरेस्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...
महिलांमध्ये तयार झाली स्वयंरोजगाराची ‘...ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
शेतीमधील ‘विमेन चॅम्पियन'पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि नाशिक जिल्ह्यातील...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस...बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त...
सुनंदाताई भागवत बनल्यात शेकडो मुलींचा...नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र...
राज्यातील चौदा टक्के शेतीक्षेत्राची ‘ती...पुणे: एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत महिलांचा...