'त्या' पोलिसांवर चार दिवसांत कारवाई

'त्या' पोलिसांवर चार दिवसांत कारवाई
'त्या' पोलिसांवर चार दिवसांत कारवाई

सातारा : पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देऊनही स्वत:ची चूक लपविण्यासाठी व्हाॅट्सॲपवर चुकीची पोस्ट फिरवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आज जिल्हा व सातारा पत्रकार संघाच्या वतीने पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे करण्यात आली. चार दिवसांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन अधीक्षक देशमुख यांनी या वेळी दिले. 

शनिवारी उंब्रजजवळ एसटी बसमध्ये चोरीचा प्रकार झाला होता. त्यामुळे एसटी उंब्रज पोलिस ठाण्यासमोर लावण्यात आली. तेथे गर्दी जमली होती. त्या घटनेचे वार्तांकन करावे, या शुद्ध आणि प्रामाणिक हेतूने ''सकाळ''चे पत्रकार व अॅग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी विकास जाधव तेथे गेले. त्या वेळी घटनास्थळावर उपस्थित असणारे हवालदार शहाजी पाटील व रवी पवार यांनी त्यांना आरोपीप्रमाणे वागणूक देत त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन केले होते.

या घटनेचा निषेध करत सर्व पत्रकारांनी रविवारी उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना कारवाईचे निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतर व्हाॅट्सॲपची पोस्ट फिरविण्यात आली. त्यामुळे आज अधीक्षक देशमुख यांना निवेदन देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. 

या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी दीपक प्रभावळकर, शरद काटकर, 'सकाळ'चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, सहायक वृत्त संपादक राजेश सोळसकर, मुख्य उपसंपादक संजय शिंदे व सर्व विभागांतील सहकारी, सातारा पत्रकार संघाचे दीपक दिक्षीत, गिरीश चव्हाण, पांडुरंग पवार, समाधान हेंद्रे, सम्राट गायकवाड, संग्राम निकाळजे, विशाल कदम, सनी शिंदे, अमित वाघमारे, स्वप्नील शिंदे, प्रशांत जाधव, गौरी आवळे, इलेक्‍ट्रॉनिक मिडीयाचे पदाधिकारी तुषार तपासे, ओंकार कदम, निखील मोरे व अन्य इलेक्‍ट्रॉनिक मीडियाचे सदस्य उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com