मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना अडविणारे राजकारणातून संपणार
वर्धा : देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्यांना देशवासीयांनी धडा शिकवला आहे. शेतकऱ्यांना अडविणाऱ्यांचा विषय राजकारणातून आणि समाजकारणातून कायमचा संपणार आहे : मंत्री सुनील केदार
वर्धा : देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्यांना देशवासीयांनी धडा शिकवला आहे. शेतकऱ्यांना अडविणाऱ्यांचा विषय राजकारणातून आणि समाजकारणातून कायमचा संपणार आहे, अशी टीका राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली.
ते पत्रकारांशी बोलत होते. कुणाचाही नामोल्लेख न करता केंद्र सरकारवर त्यांनी ताशेरे ओढले. सर्व सेवा संघाचे दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच (ता.३०) पार पडले. यावेळी येथे आले होते. मंत्री केदार म्हणाले, ‘‘राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपल्या देशाच्या सामान्य माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये स्वाभिमानी राहण्याची आणि लढण्याची जी प्रेरणा दिली होती.’’
गांधीजींच्या संस्थांची मातृसंस्था असलेल्या सर्वसेवा संघाचे दोन दिवसांचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात चंदन पाल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अधिवेशनात राज्यभरातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
- 1 of 1029
- ››