धानाच्या भरडाईस नकार देणाऱ्या  मिलर्सना काळ्या यादीत टाका

गेल्या खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाई करण्यास राईस मिलर्सनी करारानंतर ही नकार दिला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे.
धानाच्या भरडाईस नकार देणाऱ्या  मिलर्सना काळ्या यादीत टाका Those who refuse to buy grain Blacklist Millers
धानाच्या भरडाईस नकार देणाऱ्या  मिलर्सना काळ्या यादीत टाका Those who refuse to buy grain Blacklist Millers

गोंदिया : गेल्या खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाई करण्यास राईस मिलर्सनी करारानंतर ही नकार दिला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्याची दखल घेत अशा राईस मिलर्सवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली. जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा खासदार मेंढे यांचे उपस्थित घेण्यात आला. यावेळी रब्बी धान खरेदीबाबत यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. गेल्या खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी तीस हजार क्विंटल धानाची राईस मिलर्संनी अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. गेल्या हंगामातील धानाची उचल न झाल्याने अनेक संस्थांचे गोदाम भरलेले आहेत. यावर तोडगा काढण्यात सरकारला अपयश आले आहे. यात शेतकरी नाहक भरडला जात असल्याने या प्रश्नी त्वरित तोडगा काढावा. त्यासोबतच धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची निर्देश खासदार मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.  पावसाळ्याला सुरुवात झाली असून आगामी काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाच्या तयारीचा देखील त्यांनी आढावा घेतला. गेल्या वर्षी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील ३० पेक्षा अधिक गावे पुरामुळे प्रभावी झाली होती. त्यामुळे यावेळी तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने आधीच आवश्यक त्या उपाययोजना यावर भर द्यावा, अशी सूचना देखील त्यांनी केली.  यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पणन अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,  विमानतळ संचालक विनय ताम्रकार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेश चौबे, माजी आमदार संजय पुराम, लोकसभा संघटनमंत्री बाळा अंजनकर, महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष किसान आघाडी संजय टेंभरे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com