Agriculture news in marathi Those who refuse to buy grain Blacklist Millers | Page 3 ||| Agrowon

धानाच्या भरडाईस नकार देणाऱ्या  मिलर्सना काळ्या यादीत टाका

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

गेल्या खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाई करण्यास राईस मिलर्सनी करारानंतर ही नकार दिला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे. 

गोंदिया : गेल्या खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाई करण्यास राईस मिलर्सनी करारानंतर ही नकार दिला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्याची दखल घेत अशा राईस मिलर्सवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली.

जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा खासदार मेंढे यांचे उपस्थित घेण्यात आला. यावेळी रब्बी धान खरेदीबाबत यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. गेल्या खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी तीस हजार क्विंटल धानाची राईस मिलर्संनी अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. गेल्या हंगामातील धानाची उचल न झाल्याने अनेक संस्थांचे गोदाम भरलेले आहेत. यावर तोडगा काढण्यात सरकारला अपयश आले आहे. यात शेतकरी नाहक भरडला जात असल्याने या प्रश्नी त्वरित तोडगा काढावा. त्यासोबतच धानाची उचल न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची निर्देश खासदार मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

पावसाळ्याला सुरुवात झाली असून आगामी काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाच्या तयारीचा देखील त्यांनी आढावा घेतला. गेल्या वर्षी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील ३० पेक्षा अधिक गावे पुरामुळे प्रभावी झाली होती. त्यामुळे यावेळी तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने आधीच आवश्यक त्या उपाययोजना यावर भर द्यावा, अशी सूचना देखील त्यांनी केली. 
यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पणन अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,  विमानतळ संचालक विनय ताम्रकार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेश चौबे, माजी आमदार संजय पुराम, लोकसभा संघटनमंत्री बाळा अंजनकर, महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष किसान आघाडी संजय टेंभरे उपस्थित होते.


इतर बातम्या
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...