agriculture news in Marathi thousand professors cross age of 60 Maharashtra | Agrowon

एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी ओलांडली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय दोन वर्षांनी घटविल्यास एक हजार जागा खुल्या होतील. 

पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय दोन वर्षांनी घटविल्यास एक हजार जागा खुल्या होतील. त्यामुळे २४० कोटी रुपयांची बचत होईल, असा अभ्यास अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.

अॅग्रीकल्चरल डॉक्टरेट असोसिएशनच्या (एडीए) वतीने हा अभ्यास करण्यात आला. कोरोनाच्या स्थितीत कृषी विद्यापीठांच्या वेतनावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा आढावा घ्यावा, असे मत ‘एडीए’ने व्यक्त केले होते. शासन आता विद्यापीठांमधील शिक्षकवर्गीय पदांच्या सेवानिवृत्तीचे वय निश्चित करण्याबाबत आढावा घेत आहे. निवृत्ती वय,निकष, त्याचे फायदे-तोटे याबाबत लवकरच कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडे अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

सहयोगी प्राध्यापक पदाचा पगार सध्या दीड ते दोन लाख रुपये असून प्राध्यापकाचा पगार दोन लाखांच्या पुढे आहे. सध्या एक हजार जणांनी वयाची साठी ओलांडली आहे. त्यांच्या वेतनामुळे २२४ कोटी रुपयांचा आर्थिक ताण पडतो आहे, असे  ‘एडीए’ने म्हटले आहे. अकृषक विद्यापीठांप्रमाणेच कृषी विद्यापीठांमधील निवृत्ती वय ६० केल्यास एक हजार जागा रिक्त होतील. त्यामुळे महिन्याला २० कोटी वाचतील. हा निधी कोरोना नियंत्रणासाठी वापरावा.

तसेच, एक हजार सहायक प्राध्यापकांची भरती केल्यास केवळ सहा कोटी रुपये प्रतिमहा खर्च येईल, असे ‘एडीए’चे म्हणणे आहे. नव्या भरतीमुळे तरुणांना संधी मिळेल. पीएचडीधारक असून त्यांना बेरोजगार ठेवले गेले आहे. अकारण वय ६२ केल्याने विद्यापीठांनी खर्च वाढवून ठेवल्याचे ‘एडीए’ला वाटते.

प्रतिक्रिया
निवृत्ती वय कमी केल्याने विद्यापीठांमधील जाणकार प्राध्यापक कमी होतील, असा दावा केला जातो. यावर उपाय म्हणून निवृत्तीवय ६० केल्यानंतर यातील काही अनुभवी शास्त्रज्ञांना ५० ते ६० हजार रुपये मानधनावर सल्लागार म्हणून नेमावे.
- डॉ.रोहित चव्हाण, अध्यक्ष, `एडीए`


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...